शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: जगात पाचव्या स्थानी असलेल्या ‘पेरू’पेक्षाही महाराष्ट्रात रुग्ण अधिक!, देशात सर्वाधिक संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 03:02 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार पेरूमध्ये करोनाचे ६ लाख ५२ हजार ३७ रुग्ण आहेत. तर भारतात एकट्या महाराष्ट्रात ही संख्या ८ लाखावर आहे.

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढत चालली आहे. गुरुवारी राज्यात १८ हजार १०५ नवे रुग्ण आढळले असून महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या ८ लाख ४३ हजार ८४४ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कोरोना रुग्णांच्या संख्येत जगात पाचव्या स्थानी असलेल्या पेरू या देशापेक्षाही महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. महाराष्ट्र हा एक देश असता तर तो कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर राहिला असता!जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार पेरूमध्ये करोनाचे ६ लाख ५२ हजार ३७ रुग्ण आहेत. तर भारतात एकट्या महाराष्ट्रात ही संख्या ८ लाखावर आहे. कोरोनाबाधितांच्या जागतिक यादीत पहिल्या नंबरवर अमेरिका असून अमेरिकेत ६२ लाखांहून अधिक करोना रुग्ण आहेत.आरोग्यमंत्री राजेश टोप यांच्या मते, महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांची संख्या अधिक असल्याने रुग्ण संख्याही मोठी दिसत आहे. मात्र, राज्यात आत्तापर्यंत ४२ लाख ९ हजार चाचण्या झाल्या असून पॉझिटिव्ह दर १९.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत जुलै महिन्यात २ लाख चाचण्या करण्यात आल्या, तर आॅगस्टमध्ये २ लाख ३ हजार चाचण्या झाल्या आहेत. याचाच अर्थ, गेल्या महिन्यात फक्त ३ हजार चाचण्या अधिक झाल्या आहेत.पुण्यातील वाढती रुग्ण संख्यालक्षात घेता तेथे लॉकडाऊन उठवण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध होता. पण त्यांच्या परस्पर तसा निर्णय घेतला गेला.- संजय राऊत, खासदार, शिवसेना8,43,844महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्यामहाराष्ट्र जगात ५ व्या स्थानीअमेरिका : ६२,९१०३२ ब्राझिल : ४०,०१४२२ भारत : ३८,५३४०६रशिया : १०,०९९९५ महाराष्ट्र : ८,४३,८४४ पेरु : ६,६३४३४दक्षिण आफ्रिका : ६,२८२५९

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतHealthआरोग्य