शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

CoronaVirus Live Updates : दिलासादायक! राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4154 नवे रुग्ण, 44 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 20:35 IST

CoronaVirus Live Updates Maharashtra reports 4154 new COVID19 cases : राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 64 लाखांवर गेली असून आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मुंबई - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही कोरोनाचा धोका पाहायला मिळत आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही 64 लाखांवर गेली असून आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याच दरम्यान दिलासादायक आकडेवारी समोर आली असून महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात नव्या कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात शुक्रवारी (10 सप्टेंबर) कोरोनाचे 4154 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 44 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 64,91,179 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,38,061 वर पोहोचला आहे. तब्बल 62 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 62,99,760 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 49,812 जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होताना दिसून येत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. 

बाप्पा घेऊन आला 'सुखवार्ता'... तिसऱ्या लाटेची शक्यता कमीच

सणासुदीच्या दिवसांनंतर देशात कोरोना साथीची स्थिती आणखी बिकट होईल, अशी शक्यता लक्षात घेऊन सध्या तशी पूर्वतयारी केली जात आहे. मात्र, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची तूर्त तरी शक्यता नाही, असे केंद्र सरकारने नेमलेल्या कोरोनाविषयक तज्ज्ञगटाचे प्रमुख प्रा. एन. के. अरोरा यांनी सांगितले. त्यांच्या या उद्गारांनी करोडो भारतीय नागरिकांना दिलासा मिळाला आहे.  ऑक्टोबरपर्यंत कोरोना लसीचे 110 कोटींहून अधिक डोस लोकांना दिले जाण्याची शक्यता आहे.लसीकरण मोहिमेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष तसेच इंडियन सार्स-कोव्ह-2 जिनोमिक्स कॉन्सोर्टियमचे सहअध्यक्ष असलेल्या प्रा. एन. के. अरोरा यांनी दिलासा देतानाच सावध राहण्याचा इशाराही दिला आहे.

सध्या दररोज कोरोना लसीचे 85 लाख ते एक कोटीहून अधिक डोस देण्यात येत आहेत. अशा वेगाने मोहीम राबवली गेल्यास सर्व प्रौढ व्यक्तींना लसीचा पहिला डोस तरी मिळालेला असेल. मात्र, अजूनही 30 टक्के लोकांना लस मिळाली नसल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. हा धोका लक्षात घेऊन जनतेने सणासुदीच्या दिवसांत व नंतरही प्रतिबंधक नियमांचे पालन केले पाहिजे, असे आवाहन प्रा. एन. के. अरोरा यांनी केले. गेल्या काही आठवड्यांत भारतामध्ये दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांचे प्रमाण 30 ते 45 हजारांच्या दरम्यान आहे. त्यातील सर्वाधिक रुग्ण केरळ, ईशान्य भारतातील काही राज्ये व महाराष्ट्र, दक्षिण भारतातील राज्यांच्या काही जिल्ह्यांत सापडत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र