शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

coronavirus: जून-जुलै महिने चिंताजनक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 06:52 IST

देशभरातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले

मुंबई : आपण एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला; मात्र मे अखेर कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असून जून, जुलैमध्ये हा संसर्ग उच्चांकीपातळीवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा तसा इशारा दिला आहे. चीनच्या वूहानमध्ये परत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्याचे वाचण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनबाबत अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल, असे सांगत जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.देशभरातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. लॉकडाऊनबाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, देशभरात मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. मात्र मजूर विविध झोन्समधून प्रवास करीत असल्याने प्रत्येक राज्याने व्यवस्थित काळजी आवश्यक आहे. अन्यथा, कोरोनाचा प्रादर्भाव 

वाढू शकतो. लॉकडाऊनमुळे राज्याला सुमारे ३५ हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे केंद्राने जीएसटीच्या परताव्याची रक्कम आणि केंद्रीय करातील राज्याचा वाटा तातडीने द्यावा, अशी मागणीही ठाकरे यांनी यावेळी केली.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना सुरु होती. मात्र काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. आता खरीप हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे त्यांना पीककर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला सूचना द्याव्यात. सुमारे १० लाख शेतकºयांना त्याचा फायदा होईल, असे ठाकरे यांनी सांगितले. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटी शुल्क माफ करावे. काही संस्था उपकरणे आयात करीत आहेत, त्यांना सीमा शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करण्यात यावी. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना विशेष पास देऊन या सेवेचा उपयोग करता येईल, अशी मागणीही ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली.

पोलिसांना विश्रांती हवी; केंद्रीय मनुष्यबळाची गरजकोरोना महामारीच्या या संकटकाळात डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत.विशेषत: पोलिसांना विश्रांती देण्याची गरज आहे. ते आजारी पडून चालणार नाही. त्यामुळे आवश्यकता भासेल, तसे केंद्र सरकारने त्यांच्याकडील मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरील ताण कमी होईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी