शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: लक्षणे नसतील, तर कोरोना टेस्ट नको; राज्य सरकारच्या निर्णयानं सर्वसामान्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:37 IST

कोट्यवधींचा खर्च तरी रुग्णसंख्येत वाढ, नव्या मार्गदर्शक सूचना

औरंगाबाद : कोरोनाची लक्षणे असतील, तरच चाचण्या करण्याच्या नव्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. प्रवास करणाऱ्या व्यक्ती, व्यापाऱ्यांना लक्षणे नसतील, तर त्यांच्या चाचण्या करू नका, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी पाच महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला लाळेचे नमुने घेऊन चाचण्या केल्या जात होत्या. यात एका चाचणीसाठी सुमारे अडीच ते तीन हजार रुपयांचा खर्च येतो, तर अहवाल चोवीस तासांनंतर मिळतो. दरम्यान, गेल्या महिन्यापासून अँटिजन पद्धतीने तपासणी करण्यात येत आहे. पाचशे रुपयांमध्ये असलेल्या कीटमुळे अहवाल अवघ्या वीस मिनिटांत मिळतो. त्यामुळे बाधित रुग्ण तातडीने समोर येतात, तसेच संशयितांना क्वारंटाईन करण्यासाठी लागणार खर्च कमी होतो.

संसर्ग रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्यानंतरही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात केंद्र शासनाने कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे आदेश नुकतेच काढले होते. असे असतानाच शुक्रवारी राज्याच्या आरोग्य विभागाने नव्याने मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. त्यात लक्षणे असतील, तरच चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आलेआहेत.राज्य शासनाच्या आदेशात काय? 

  • कोरोना टेस्ट करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यांचीच अँटिजन चाचणी करण्यात यावी. त्यामुळे अर्ध्या तासात उपचारासंदर्भात निर्णय घेणे शक्य होईल.
  • अँटिजनमध्ये निगेटिव्ह आलेले; पण लक्षणे असलेले नागरिक, तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या हायरिस्कमध्ये असलेले व विदेशातून आलेल्या व्यक्तींचीच आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी.
  • रुग्णालयात येण्यापूर्वी मृत्यू पावलेल्या व्यक्ती, बाळंतपणासाठी आलेल्या माता, अत्यावश्यक शस्त्रक्रियेच्या रुग्णांची चाचणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी ही सुविधा नाही तिथे अँटिजन चाचणी करण्यात यावी.
  • मनोरुग्णालयात दाखल होणाºया व्यक्तींना सुरुवातीला एक आठवडा क्वारंटाईन ठेवावे. त्यानंतर अँटिजन टेस्ट करावी.
  • तुरुंगात कैदी दाखल झाल्यानंतर एक आठवडा क्वारंटाईन ठेवावे. त्यानंतर अँटिजन चाचणी करावी. चाचणीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घ्यावा.
  • केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चाचण्या कराव्यात.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार