CoronaVirus News: राज्याला कोरोनाचा दुहेरी धोका; रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, मृत्यूदरही देशाच्या तुलनेत अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 09:04 PM2020-07-19T21:04:30+5:302020-07-19T21:08:58+5:30

CoronaVirus News: आज दिवसभरात ९ हजार ५१८ रुग्ण आढळले; २५८ जण मृत्यूमुखी

CoronaVirus highest one day spike in corona patient in state mortality rate higher than country | CoronaVirus News: राज्याला कोरोनाचा दुहेरी धोका; रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, मृत्यूदरही देशाच्या तुलनेत अधिक

CoronaVirus News: राज्याला कोरोनाचा दुहेरी धोका; रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, मृत्यूदरही देशाच्या तुलनेत अधिक

Next

मुंबई - देशातील मृत्यूदर रविवारी पहिल्यांदाच २.५ टक्क्यांच्या खाली आला आहे. मृत्युदर हळूहळू कमी होत असून सध्या २.४९ टक्के आहे. जगातील सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण असलेल्या देशांपैकी भारत एक आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे, राज्याचा मृत्यूदर देशाच्या तुलनेत अधिक आहे. राज्यात ३.८२ एवढा मृत्यूदर आहे. याखेरीज, राज्यात पहिल्यांदाच सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली असून ही संख्या ९ हजार ५१८ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात २५८ मृत्यू झाले आहेत.

राज्यात ३ लाख १० हजार ४५५ कोरोना बाधितांची नोंद झाली असून बळींचा आकडा ११ हजार ८५४ वर पोहोचला आहे. सध्या राज्यात १ लाख २८ हजार ७३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दिवसभरात ३ हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत १ लाख ६९ हजार ५६९ जण कोविडमुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के आहे. रविवारी नोंद झालेल्या २५८ मृत्यूंमध्ये मुंबई ६४, ठाणे ७, ठाणे मनपा १२, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा २२, उल्हासनगर मनपा ४, भिवंडी निजामपूर मनपा ७, पालघर १, वसईविरार मनपा ११, रायगड ८, पनवेल मनपा ५, नाशिक १०, अहमदनगर १, अहमदनगर मनपा १, धुळे मनपा १, जळगाव १०, जळगाव मनपा १, नंदूरबार १, पुणे ५,पुणे मनपा २५, पिंपरी चिंचवड मनपा १५, सोलापूर १, सोलापूर मनपा १, सातारा ५, कोल्हापूर १, सांगली ४, सांगली मिरज कुपवाड मनपा २, रत्नागिरी २, औंरगाबाद ५, जालना १, परभणी मनपा १, लातूर २, लातूर मनपा २, उस्मानाबाद १, अकोला २, यवतमाळ १, वाशिम १, नागपूर १,  नागपूर मनपा ६ या रुग्णांचा समावेश आहे.

मुंबई दिवसभरात १ हजार ३८ रुग्ण आणि ६४ मृत्यू झाले आहेत. शहर उपनगरात एकूण रुग्णसंख्या १ लाख १ हजार ३८८ इतकी असून मृतांचा आकडा ५ हजार ७१४ झाला आहे. सध्या २३ हजार ६९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १५ लाख ६४ हजार १२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.८५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७ लाख ५४ हजार ३७० व्यक्ती घरगुती अलगीकरणात तर ४५ हजार ८६४ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
 

Web Title: CoronaVirus highest one day spike in corona patient in state mortality rate higher than country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.