एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; लालपरी बंद असूनही फुल पगार होणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 06:18 PM2020-03-30T18:18:57+5:302020-03-30T18:19:36+5:30

एसटीचे गैरहजर कर्मचारी, सुट्टीवर असणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मार्चचा पूर्ण पगार मिळणार आहे.

CoronaVirus: Good news for ST staff; will get full march payment hrb | एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; लालपरी बंद असूनही फुल पगार होणार 

एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; लालपरी बंद असूनही फुल पगार होणार 

Next

मुंबई : कोरोना विषाणूमुळे राज्यभरातील एसटी सेवा पूर्णपणे बंद केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. फक्त मुंबई, पालघर, ठाणे या विभागात अत्यावश्यक सेवा दिली जात आहे. मात्र, कोरोनाचे संकट पाहता, एसटीने कोणत्याही कर्मचाऱ्यांचे नुकसान न करता, सरसकट मार्चचा पगार देण्यात येणार आहे.

एसटीचे गैरहजर कर्मचारी, सुट्टीवर असणाऱ्या आणि सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मार्चचा पूर्ण पगार मिळणार आहे, असे आदेश एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहेत. 


देशात व राज्यात कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे हाहाकार उडालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात संचार बंदी घोषित केली आहे. या परिस्थितीत एसटीचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा चोख बजावत आहेत. मुंबई महानगरात आवश्यक सेवेसाठी एसटी कर्मचारी काम करत आहेत. त्यामुळे  मागील महिन्याइतकेच सरसकट वेतन ०१ व  ०७ एप्रिल रोजी एसटी कर्मचार्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत,  महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने केली होती. 

Web Title: CoronaVirus: Good news for ST staff; will get full march payment hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.