मुंबई: कोरोना विषाणुला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुट्टी आणि कार्यालयीन कामकाजाबाबत समाज माध्यमांवरून प्रसारित होत असलेले परिपत्रक खोटे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.|केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक असे भासवून, या परिपत्रकात सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबतचे तसेच दंडाच्या तरतुदीबाबत खोटी माहिती पसरवण्यात येत आहे. वस्तूतः त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. हे परिपत्रक खोटे आहे, अशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत. यासंदर्भात शासनाने गंभीर दखल घेतली असून, याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्य शासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Coronavirus: केंद्राच्या नावानं व्हायरल झालेलं 'ते' परिपत्रक खोटं; उद्यापासून ८ दिवस कोणतीही सुट्टी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 21:37 IST
उद्यापासून आठ सुट्टी जाहीर करण्यात आल्याचं परिपत्रक खोटं; सायबरकडून तपास सुरू
Coronavirus: केंद्राच्या नावानं व्हायरल झालेलं 'ते' परिपत्रक खोटं; उद्यापासून ८ दिवस कोणतीही सुट्टी नाही
ठळक मुद्देकेद्रांच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नावानं फेक पत्रक व्हायरलबोगस परिपत्रकात १४ ते २१ मार्च सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा उल्लेखकेंद्राकडून कोणतेही आदेश नाहीत; राज्य सरकारची माहिती