शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

coronavirus: ई-पास रद्द; आंतरजिल्हा प्रवास खुला, खासगी बससेवा सुरू; मुंबई मेट्रो, लोकल, रेस्टॉरंट मात्र बंदच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 6:26 AM

राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र अनलॉक-४ अंतर्गत दिलेल्या सवलतींची अंमलबजावणी २ सप्टेंबरपासून म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून होणार आहे.

मुंबई : पुनश्च हरिओमच्या पुढच्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणताना राज्य शासनाने लॉज आणि हॉटेल १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, इतर रेस्टॉरंट बंदच राहणार आहेत. आंतरजिल्हा प्रवासासाठीचा ई-पास रद्द करण्यात आला असून खासगी बसेसना परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. मात्र अनलॉक-४ अंतर्गत दिलेल्या सवलतींची अंमलबजावणी २ सप्टेंबरपासून म्हणजे गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून होणार आहे.शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, सर्व प्रकारचे रेस्टॉरन्ट, जिम बंद असतील पण रेस्टॉरन्टमधून पार्सलसेवा पूर्वीप्रमाणेच सुरू असेल. आधी ३३ टक्के उपस्थितीने लॉज आणि हॉटेल (लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंग) सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. आता सोशल डिस्टंन्सिगच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत १०० टक्के क्षमतेने ती सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.खासगी कार्यालयांमध्ये आतापर्यंत १० कर्मचारी वा १० टक्के कर्मचारी यापैकी जास्त असलेल्या संख्येने कर्मचारी उपस्थितीची मुभा होती. आता ती ३० टक्के कर्मचारी वा ३० कर्मचारी अशी असेल.धार्मिक स्थळे बंदच राहणारधार्मिक स्थळं उघडण्यासंदर्भात आंदोलने सुरू असली तरी ती तूर्त बंदच ठेवण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. परिस्थितीचा पुन्हा आढावा घेऊन या बाबत येत्या काही दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे.काय सुरू होणारलॉज आणि हॉटेलजिल्हांतर्गत वाहतुकीसाठीयापुढे ई-पासची गरज नाहीखासगी बस, मिनी बस-आंतरराष्टÑीय विमान प्रवास(गृहमंत्रालयाच्या निर्देशानुसार)रिक्षामध्ये चालकासहदोन तर चारचाकीमध्ये चालकासह तीन प्रवाशांना मुभाकाय बंद राहणाररेस्टॉरंट आणि बार,नाट्य आणि सिनेमागृह,जिम, स्विमिंग पूललोकल, मेट्रो, रेल्वेसेवा बंदशाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळेसामाजिक, राजकीय, क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदीकोणत्याही अटीशिवाय दुसºया जिल्ह्यात जाता येणारआजच्या निर्णयामुळे आंतरजिल्हा वाहतुकीवरीलसर्व निर्बंध उठविण्यात आले आहेत. आताकोणत्याही अटीशिवाय एका जिल्ह्यातून दुसºया जिल्ह्यात जाता येईल.सरकारी कार्यालयांतील उपस्थितीबाबत नवे नियमसरकारी कार्यालयांमध्ये वर्ग-१ आणि २ चे अधिकारी १०० टक्के उपस्थित राहतील. मात्र, वर्ग-३ आणि ४ चे ५० कर्मचारी वा ५० टक्के कर्मचारी यापैकी जी जास्त असेल, त्या संख्येने उपस्थित राहतील. मुंबईसह एमएमआर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी- चिंचवडच्या पीएमआर क्षेत्रात सरकारी कार्यालयांमधील वर्ग-१ आणि वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांची उपस्थिती १०० टक्के असेल, पण वर्ग-३ आणि ४ चे कर्मचारी हे ३० टक्के वा ३० यापेक्षा जास्त असलेल्या संख्येने उपस्थित राहतील.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक