शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

coronavirus: आठवड्यात ६० तासांपेक्षा जास्त काम देऊ नका; शासनाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 05:32 IST

कामगारांच्या कामाच्या वेळेतील बदलाचा रासायनिक किंवा इतर धोकादायक कारखान्यांमधील सुरक्षिततेवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी कारखान्यांची असेल.

- विशेष प्रतिनिधी मुंबई : कारखान्यांनी आपल्या कामगारांना एक आठवड्यात ६० तासांपेक्षा अधिक काम देऊ नये, असा आदेश राज्याच्या कामगार विभागाने काढला आहे. त्यात कामगारांसंदर्भात काही सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालक डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी काढलेल्या या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, कामगारांच्या ओव्हरटाइमचे वेतन हे साधारण वेतनाच्या दुप्पट दराने दिले पाहिजे.कामगारांच्या कामाच्या वेळेतील बदलाचा रासायनिक किंवा इतर धोकादायक कारखान्यांमधील सुरक्षिततेवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी कारखान्यांची असेल. कोणत्याही दिवशी कामाचे तास १२ तासांपेक्षा जास्त नसावेत. कामाचे तास हे विश्रांतीच्या वेळेसह १३ तासांपेक्षा अधिक असू नयेत. कोणत्याही आठवड्यात एकूण कामाचे तास साआठ तासांपेक्षा अधिक असू नयेत.कोणत्याही कामगारास सलग सात दिवस ओव्हरटाइम देऊ नये तसेच कोणत्याही तिमाहीत ओव्हरटाइमचे तास हे ११५ तासांपेक्षा जास्त असू नयेत. ही सूट ३० जूनपर्यंत राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कारखान्यांच्या मालकांनी आवश्यक सर्व खबरदारी घेतली पाहिजे. कारखान्यांमधील उत्पादक प्रक्रियेदरम्यान दोन कामगारांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे तसेच मास्कचा वापर अनिवार्य करावा, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEmployeeकर्मचारीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार