CoronaVirus News: राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार?; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात...

By कुणाल गवाणकर | Published: November 22, 2020 05:59 PM2020-11-22T17:59:46+5:302020-11-22T18:01:10+5:30

CoronaVirus News: राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ

CoronaVirus decision of lockdown will be taken after reviewing situation says ajit pawar | CoronaVirus News: राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार?; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात...

CoronaVirus News: राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार?; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात...

Next

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं पुन्हा एकदा लॉकडाऊनचा (Lockdown In Maharashtra) निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. दोन-तीन दिवस परिस्थितीची समीक्षा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं पवार म्हणाले आहेत. संबंधित विभागांशी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. उत्सव काळात अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

आम्ही २ ते ३ दिवस परिस्थितीचा आढावा घेऊ. त्यानंतर लॉकडाऊन करायचा की नाही, याबद्दलचा निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले. 'दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी बरीच गर्दी पाहायला मिळाली. कोरोना या गर्दीत आपोआप मरून जाईल की काय अशी परिस्थिती होती. कोरोनाची दुसरी लाट येईल असं आता म्हटलं जात आहे. सरकारनं अनेक जिल्ह्यांमधल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,' असं पवार यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री आज जनतेशी संवाद साधणार; मोठी घोषणा करण्याची शक्यता

कोरोना रुग्णांचा आकडा वाढला
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. काल दिवसभरात राज्यात कोरोनाचे ५ हजार ७६० नवे रुग्ण आढळून आले. तर ६२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा ४६ हजार ५७३ वर पोहोचली. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १७ लाख ७४ हजार ४५५ वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण १६ लाख ४७ हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ७९ हजार ८७३ जणांवर उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री संवाद साधणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आज जनतेला संबोधित करताना राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा, पुन्हा लॉकडाऊन की वीज बिल सवलतीबाबत मोठी घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्या घोषणा होणार?
दिवाळीनंतर देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. तर मुंबईत सुद्धा कोरोनाचा आकडा वाढत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा लॉकडाऊनबाबत भाष्य करणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, शाळा पुन्हा सुरु करणे, वाढीव वीजबिलावर सवलत यांसह अनेक विषयांवर बोलणार असल्याची चर्चा आहे. मात्र, उद्धव ठाकरे नेमकं कोणत्या विषयावर बोलणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus decision of lockdown will be taken after reviewing situation says ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app