शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

Coronavirus: राज्यातील पाच जिल्ह्यांत कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण, मुंबईसह या जिल्ह्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 11:16 AM

Coronavirus: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार सध्या ७ हजार ५५५ रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी ६ हजार ५८६ रुग्ण, म्हणजेच ७९ टक्के मुंबई, पुणे, ठाणे, अहमदनगर व नाशिक या पाच जिल्ह्यांत आहेत. तर उरलेल्या ३० जिल्ह्यांमध्ये २१ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. 

 मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार सध्या ७ हजार ५५५ रुग्ण सक्रिय आहेत. त्यापैकी ६ हजार ५८६ रुग्ण, म्हणजेच ७९ टक्के मुंबई, पुणे, ठाणे, अहमदनगर व नाशिक या पाच जिल्ह्यांत आहेत. तर उरलेल्या ३० जिल्ह्यांमध्ये २१ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. 

राज्यात सध्या ७ हजार ५५५ रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबईत २,२५०, पुण्यात २,०७७, ठाण्यात १,०६०, नगरमध्ये ८०२ आणि नाशिकमध्ये ३९७ रुग्ण दाखल आहेत. रुग्ण सक्रियतेबाबत पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर मुंबई आहे. इतर पाच जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या १०० ते २६३ च्या दरम्यान आहे. यामध्ये रायगड जिल्हा २६३, सोलापूर २२७, पालघर १९२, औरंगाबाद १२१ आणि कोल्हापूर ११० रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात आतापर्यंत साडेसहा कोटी नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ६६ लाख ३४ हजार जण पॉझिटिव्ह आले आहेत. म्हणजेच आतापर्यंत झालेल्या चाचण्यांपैकी १० टक्के चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यापैकी ६४ लाख ८२ हजार जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात जे सक्रिय रुग्ण आहेत, त्यामध्ये पुण्याचा वाटा २५ टक्के इतका आहे. पुण्यात २ हजार ७७ रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यापैकी पुणे महापालिकेत ८१३, पिंपरी- चिंचवडमध्ये ३५०, तर उरलेली रुग्णसंख्या ही ग्रामीण भागातील आहे. 

अकोला, बुलडाणा, हिंगोली, अमरावती, चंद्रपूर, परभणी, जालना, बीड, सांगली, रत्नागिरी, नागपूर येथील रुग्णसंख्या १३ ते ६२ दरम्यान आहे. तर गोंदिया, नंदुरबार, वाशिम, भंडारा, गडचिरोली, धुळे, जळगाव, नांदेड, यवतमाळ, वर्धा व उस्मानाबाद येथे सक्रिय रुग्ण १० च्या आत आहेत. 

राज्यात ७ हजार ५५५ रुग्ण उपचाराधीनnराज्यात ६७८ रुग्ण आणि ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ९४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ६४ लाख ८३ हजार ४३५ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. सध्या राज्यात ७ हजार ५५५ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. nराज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ टक्के आहे तर मृत्युदर २.१२ टक्के आहे. आजपर्यंत तपासलेल्या ६ कोटी ५५ लाख ११ हजार ३९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०.१३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६६ लाख ३५ हजार ६५८ झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ४० हजार ९९७ झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या