शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
3
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
4
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
5
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
6
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
7
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
8
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
9
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
10
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
11
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
12
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
13
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
14
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
15
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
16
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
17
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
18
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
19
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
20
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

Coronavirus: राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 52वरून 63वर; मुंबईत 10 नव्या रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 12:07 PM

मुंबईत 10, तर पुण्यात एक अशा 11 नव्या रुग्णांची नोंद होऊन राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 63वर पोहोचला आहे.

मुंबईः कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यातही वाढ झाली असून, 52वरून रुग्णांची संख्या आता 63वर पोहोचली आहे. मुंबईत 10 जणांना कोरोनाची लागण झाली असून, विदेशातून आलेल्या रुग्णांच्या संसर्गातून तिघांना बाधा झाली आहे. मुंबईत 10, तर पुण्यात एक अशा 11 नव्या रुग्णांची नोंद होऊन राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 63वर पोहोचला आहे. 63पैकी 12 ते 14 जणांना संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे, तर उर्वरित कोरोनाबाधित हे परदेशातून आलेले आहेत. राज्यात सध्या कोरोना तपासणीच्या 7 लॅब कार्यरत असल्याचीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

राज्यात कोरोनानं 63 जण संक्रमित झाले आहेत. काल संख्या 52 होती आता ती थेट 63 झाली आहे. या नवीन रुग्णांत  10 मुंबईचे आहेत, एक पुण्याचा आहे. परदेशातून आलेले लोक 8 आहेत. तीन हे त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. काल पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत  झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टेस्टिंगची सुविधा वाढवून देण्याची मागणी केली आहे. तोच मुद्दा मी पवारसाहेबांना सांगितला होता, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत राज्यातील टेस्टिंग लॅब वाढल्याच पाहिजेत. महाराष्ट्रातल्या रुग्णालयात आम्ही टेस्टिंग सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आयसीएमआरआयच्या नियमावलीत आम्ही बसत असू, तरच आम्हाला परवानगी द्या, असंसुद्धा आम्ही डॉ. हर्षवर्धन यांना सांगितलं आहे. आम्ही तुमचे सर्व नियम पाळू, फक्त आम्हाला परवानगी द्या आणि किट्स द्या, त्याला मात्र तुम्ही नाही म्हणू नका, असा केंद्राकडे आग्रह धरलेला आहे. पूर्वी फक्त कोरोनाच्या तपासणी करण्यासाठी तीन प्रयोगशाळा होत्या, आता जवळपास त्यांची संख्या सातवर गेलेली आहे. या टेस्टिंग लॅबची संख्या 12 ते 15पर्यंत व्हायला हवी, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस