शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

CoronaVirus News: राज्य सरकारकडून 'जगात भारी' प्लाज्मा सेंटर सुरू; मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 2:38 PM

जगातील सर्वात मोठं प्लाज्मा सेंटर राज्य सरकारकडून सुरू

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्लाज्मा उपचार सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं आहे. उद्या सरकारकडून मोठ्या प्लाज्मा उपचार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री ठाकरेंनी जनतेला संबोधित करताना दिली होती. हे कदाचित जगातलं सर्वात मोठं प्लाज्मा केंद्र असेल, असंदेखील त्यांनी म्हटलं होतं. प्लाज्मा उपचार पद्धतीमुळे ९० टक्के रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकार या उपचार पद्धतीचा वापर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.  मुंबईच्या लिलावती रुग्णालयात पहिल्यांदा प्लाज्मा उपचार पद्धतीचा वापर झाला. ती यशस्वी ठरली. त्यानंतर नायर रुग्णालयात आणखी एका रुग्णावर या पद्धतीचा वापर करण्यात आला. त्यानंतर सातत्यानं प्लाज्मा पद्धतीचा वापर केला जाऊ लागला. प्लाज्मा पद्धती दर १० पैकी ९ रुग्णांवर परिणामकारक असल्याचं सिद्ध झालं आहे. आजपासून ५०० रुग्णांवर प्लाज्मा पद्धतीनं उपचार केले जातील. यासाठी सरकारनं ७० कोटींचा खर्च केला आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्लाज्मा उपचार पद्धतीची माहिती दिली. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाज्माच्या मदतीनं बहुतांश कोरोना रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी पुढे यावं आणि प्लाज्मा दान करावं, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं होतं. यावेळी त्यांनी रक्तदानाच्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला. कोरोना संकट येताच सुरुवातीला मी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला राज्यातल्या जनतेनं मोठा प्रतिसाद दिला. रक्ताचा तुटवडा दूर झाला. त्याचप्रकारे प्लाज्मा दान करण्याच्या आवाहनालाही प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. काल दिवसभरात राज्यात ५,४९३ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या १,६४,६२६ वर पोहोचली. काल राज्यात कोरोनामुळे १५६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा ७,४२९ वर पोहोचला. आतापर्यंत ८६,५७५ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून ७०,६०७ जणांवर उपचार सुरू आहेत.राज्यातल्या जनतेसाठी पुढे या; कोरोनातून बऱ्या झालेल्या हजारो जणांना मुख्यमंत्र्यांचं आवाहनलॉकडाऊन कायम राहणार, मात्र निर्बंध शिथिल होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सूतोवाच

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे