शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

Coronavirus: राज्यात ७३० खाटांची ८ कोरोना रुग्णालये सुरू; कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 6:16 AM

२२ बाजार समित्या रुग्णालये उभारणार, पारोळा, अहमदनगर, शेवगाव, बार्शी, मानवत, जिंतूर, सेलू आणि परभणी या आठ ठिकाणी रुग्णालये सुरू झाली आहेत.

ठळक मुद्देपरळी, संगमनेर, श्रीरामपूर या तीन ठिकाणी २०० खाटांची रुग्णालये लवकरच सुरू होणार खामगाव आणि भिवंडी या दोन बाजार समित्यांनी वैद्यकीय साहित्यासाठी २५ लाख रुपये दिले आहेत. राज्यामध्ये ३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यांनी कोविड सेंटरची उभारणी करावी, मंत्र्यांचे आवाहन

अतुल कुलकर्णीमुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी राज्यात ७३० खाटांची ८ कोरोना रुग्णालये सुरू केली असून, आणखी तीन ठिकाणी २०० खाटांची रुग्णालये सुरू होत आहेत. पणन संचालक सतीश सोनी यांनी ही माहिती लोकमतला दिली. २२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी, कोविड सेंटर सुरू करण्याविषयी तयारी दर्शवल्याचेही त्यांनी सांगितले.

पारोळा, अहमदनगर, शेवगाव, बार्शी, मानवत, जिंतूर, सेलू आणि परभणी या आठ ठिकाणी रुग्णालये सुरू झाली आहेत. परळी, संगमनेर, श्रीरामपूर या तीन ठिकाणी २०० खाटांची रुग्णालये लवकरच सुरू होत असल्याचेही ते म्हणाले. खामगाव आणि भिवंडी या दोन बाजार समित्यांनी वैद्यकीय साहित्यासाठी २५ लाख रुपये दिले आहेत. राज्यामध्ये कोविडमुळे गंभीर परिस्थिती उद्भवली असून सर्वत्र रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन बेड सुविधा उपलब्ध करून देणे, सॅच्युरेटेड ऑक्सिजन पुरवठा करावयाच्या मशिनचा पुरवठा करणे तसेच कोविडच्या उपचारांची निगडीत सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असून त्याची सुरुवातही केली आहे.

बाजार समित्यांनी कोविड केअर सेंटरसाठी जागा उपलब्ध करून देणे, रुग्णांसाठी बेडची व्यवस्था, चहा-नाष्टा, जेवण, कोविड केअर सेंटरला बेड, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा आदींबाबत बाजार समित्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सतत आढावा घेतला जात आहे. 

राज्यामध्ये ३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यांनी कोविड सेंटरची उभारणी करावी, असे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले होते. बाजार समित्यांनी पणन संचालकांकडे सरप्लस रकमेतून खर्चाची परवानगी मागितली होती. दहा लाखांवर सरप्लस असलेल्या १३७ बाजार समित्या असून, त्यांनी कोविड सेंटर सुरू करणे तसेच इतर कोविड सेंटरला अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे अनेकांना उपचार मिळण्यास मदत होणार आहे. - सतीश सोनी,  पणन संचालक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती