शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

coronavirus : दिलासादायक, राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त, तिशी-पन्नाशीतील रुग्णांची संख्या सर्वाधिक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 17:31 IST

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भातील महत्वपूर्ण माहिती दिली

ठळक मुद्देघरी सोडण्यात आलेल्या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून २८१ महिला आहेतराज्यात जास्त रुग्ण मुंबई परिसरात आढळून येत असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईची ३७४ एवढीराज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतेय

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा वाढत असतानाच मंगळवारी एकाच दिवशी कोरोनाच्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ही दिलासादायक बाब असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या ७२२ जणांपैकी पुरूषांची संख्या सर्वाधिक ४४१ असून २८१ महिला आहेत. त्यामध्ये ३१ ते ५० या वयोगटातील ३१८ रुग्णांचा समावेश आहे. त्या खालोखाल २१ ते ३० वयोगटातील १६० रुग्ण बरे झाले आहेत तर ९८ रुग्ण हे ५१ ते ६० वयोगटातील आहेत. लक्षणीय बाब अशी की ९१ ते १०० वयोगटातील एका रुग्णाने कोरोनाला हरविण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी आज दिली.दरम्यान, राज्यात जास्त रुग्ण मुंबई परिसरात आढळून येत असतानाच बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईची ३७४ एवढी आहे. त्यापाठोपाठ पुणे महापालिका परिसरात १२० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.राज्यात कोरोना रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतेय. २३ मार्चला पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत साधारणत: महिन्याभरात ७२२ रुग्ण घरी गेले आहे. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज सुमारे २६ रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत.राज्यात कोरोनाच्या चाचण्यांची संख्या सर्वाधिक असल्याने रुग्णांचे निदान होण्याची संख्याही वाढत आहे. मंगळवारपर्यंत राज्यात ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहता लक्षात येईल की साधारणता ३१ ते ६० वयोगटातील ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना मुक्त ७२२ रुग्णांचा वयोगट आणि कंसात बरे झालेल्यांची संख्या: शून्य ते १० (१९); ११ ते २० (५९) ; २१ ते ३० (१६०); ३१ ते ४० (१६४); ४१ ते ५० (१५४); ५१ ते ६० (९८); ६१ ते ७० (४५); ७१ ते ८० (१५); ८१ ते ९० (७); ९१ ते १०० (१).घरी सोडण्यात आलेल्या ७२२ रुग्णांची जिल्हा- मनपा निहाय संख्या : अहमदनगर मनपा- ५, अहमदनगर ग्रामीण-११, औरंगाबाद मनपा- १४, बुलढाणा- ८, गोंदीया, हिंगोली, जळगाव मनपा प्रत्येकी १, कल्याण-डोंबिवली मनपा- ३१, कोल्हापूर मनपा-२, लातूर ग्रामीण-८, मीरा भाईंदर मनपा- ५, मुंबई मनपा- ३७४, नागपूर मनपा- १२, नाशिक मनपा व ग्रामीण प्रत्येकी १, नवी मुंबई मनपा- १९, उस्मानाबाद- ३, पालघर ग्रामीण-१, पनवेल मनपा- १३, पिंपरी-चिंचवड मनपा- १२, पुणे मनपा- १२०, पुणे ग्रामीण- ५, रायगड ग्रामीण-३, रत्नागिरी-१, सांगली ग्रामीण- २६, सातारा- ३, सिंधुदूर्ग-१, ठाणे मनपा १६, ठाणे ग्रामीण-  ४, उल्हासनगर मनपा- १, वसई-विरार मनपा- १२, यवतमाळ-७

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याRajesh Topeराजेश टोपे