शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

Coronavirus: चिंताजनक! मुंबईत ५७ नवे रुग्ण सापडले; राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४९०वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 19:32 IST

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९०च्या वर गेला असून, ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबई – मुंबईच्या मायानगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव तासागणिक वाढतोय. परिणामी, कोरोनाच्या संसर्गाचा धोका वेळीच ओळखला नाही, तर परिस्थिती आणखी चिंताजनक होणार आहे. मागील २४ तासांत मुंबई शहर उपनगरात ५७ नव्या कोरोना (कोविड-१९) रुग्णांचे निदान झाले असून आता महानगरातील कोरोना बाधितांची संख्या ४९० वर जाऊन पोहोचली आहे. तर मुंबईत शनिवारी व रविवारी प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहर उपनगरातील मृतांचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. सोमवारी पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. कोरोनामुळे मृत झालेल्या चारही रुग्णांना दीर्घकालीन आजार होता. आतापर्यंत महापालिकेच्या चमूने १५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण केले असून ६६५ सहवासितांची शोध घेऊन चाचणी कऱण्यात आली आहे. तसेच घरोघरी १४०० इतके नमुने पाच चमूंमार्फत एकत्रित कऱण्यात आले आहे. या शोध, तपासणी व उपचार अशा त्रिसुत्रींतून तब्बल १३० कोरोना (कोविड१९) रुग्ण सापडले आहेत. एकूण १०,९६८ सहवासितांचे अलगीकरण कऱण्यात आले आहे. त्यातील ३९९० सहवासितांनी ५ एप्रिलपर्यंत अलगीकरण काळ पूर्ण केला आहे. आजपर्यंत २२६ प्रतिबंधात्मक क्षेत्र शोधले आहेत आणि अद्ययावत करण्यात येत आहेत.

.................................................

कोविड क्लिनिकमधून ११२ नमुने

प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये संशयित कोविड-१९ रुग्ण शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी डॉक्टर, परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ नेमण्या आले आहेत. ५ एप्रिल रोजी १० क्लिनिक सुरु कऱण्यात आले. त्यामध्ये ४६० सहवासितांपैकी १२२ नमुने घेण्यात आले.

............................................

बळींची संख्या ३४ वर

परळ येथील ग्लोबल रुग्णालयात ८० वर्षीय पुरुषाला २९ मार्च रोजी दाखल कऱण्यात आले. त्यावेळेस, त्या रुग्णाला ताप, श्वसनास त्रास व उच्चरक्तदाब अशा समस्या होत्या. सर्व अवयव निकामी झाल्याने रविवारी सायंकाळी या रुग्णाचा मृत्यू ओढावला. ०३ एप्रिल रोजी खासगी प्रयोगशाळेद्वारे त्यास कोरोनाचे निदान झाले होते. जोगेश्वरी ट्रामा रुग्णालयातील ४१ वर्षीय पुरुष ०२ मार्च रोजी ताप असल्याने दाखल झाला, त्यास मद्यपानाची सवय होती. त्याचा रविवारी सायंकाळी श्वसनाच्या तीव्र समस्येने मृत्यू झाला. ०१ एप्रिल रोजी खासगी प्रयोगशाळेत त्या रुग्णास कोरोनाचे निदान झाले. याखेरीज, याच रुग्णालयात ६२ वर्षीय पुरुषाला ०१ एप्रिल रोजी ताप, बेशुद्धावस्थेत उपचारासाठी दाखल केले. या रुग्णाला पक्षाघात, उच्चरक्तदाब व एपिलॅप्सीचा त्रास होता या रुग्णाचा मृत्यू ०४ एप्रिल रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने झाला. ३१ मार्च रोजी खासगी प्रयोगशाळेत त्याचे कोरोनाचे निदान झाले होते. तर सेंट जाॅर्ज रुग्णालयात ५२ वर्षीय रुग्ण कफ व श्वसनाच्या त्रासामुळे दाखल झाला होता. त्याला मधुमेह होता. या रुग्णांचा ०४ एप्रिल रोजी सायंकाळी मृत्यू झाला, याच दिवशी त्याचा कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह असल्याचे निदान झाले.

......................................................

बाह्यरुग्ण विभागात तपासणी आलेले रुग्ण          १९७

एकूण भरती झालेले संशयित रुग्ण                १५०

एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण                              ५७

घरी सोडलेले रुग्ण                                ०५

आतापर्यत बाह्यरुग्ण विभागात तपासणी आलेले रुग्ण ९८६१

एकूण भरती झालेले संशयित रुग्ण                २८०६

एकूण मृत रुग्णांची संख्या                      ३४

आतापर्यंत घरी सोडलेले रुग्ण                    ५९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस