Coronavirus : राज्यात दिवसभरात आढळले ४३५५ नवे कोरोना रुग्ण; ११९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 11:16 PM2021-08-24T23:16:13+5:302021-08-24T23:18:07+5:30

आतापर्यंत राज्यात एकूण १,३६,३५५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के आहे. तसेच आतापर्यंत राज्यात एकूण ६२,४३,०३४ करोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus: 4355 new corona patients found in the state during the day | Coronavirus : राज्यात दिवसभरात आढळले ४३५५ नवे कोरोना रुग्ण; ११९ जणांचा मृत्यू

Coronavirus : राज्यात दिवसभरात आढळले ४३५५ नवे कोरोना रुग्ण; ११९ जणांचा मृत्यू

Next

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसरलेली दिसत नाही. राज्यात अजूनही रोजच्या रोज मोठ्या प्रमाणावर नवे कोरोना रुग्ण समोर येतच आहेत. आज राज्यात तब्बल ४ हजार ३५५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ११९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४ हजार २४० रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. काल १०५ जणांचा मृत्यू झाला होता. (Coronavirus: 4355 new corona patients found in the state during the day)

आतापर्यंत राज्यात एकूण १,३६,३५५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के आहे. तसेच आतापर्यंत राज्यात एकूण ६२,४३,०३४ करोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट सध्या ९७.०५ टक्के एवढे आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांचा आकडा ६४,३२,६४९ वर पोहोचला आहे.

मुंबईत गेल्या २४ तासात २७० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद -
मुंबईत गेल्या २४ तासात २७० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७,२०,४७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के एवढा झाला आहे. तर गेल्या २४ तासांत मुंबईत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २७९१ सक्रिय रुग्ण आहेत. 


अशी आहे देशाची स्थिती -
देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसलेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 25 हजार 467 नवे रुग्ण आढळून आले. तर 354 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 39 हजार 486 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तत्पूर्वी, सोमवारी देशात 25,072 नवे कोरोनाबाधित आढळून आले होते.

Web Title: Coronavirus: 4355 new corona patients found in the state during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.