coronavirus: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज पुन्हा मोठी वाढ, तब्बल ४२२ रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 09:47 PM2020-08-18T21:47:02+5:302020-08-18T21:47:46+5:30

दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे झाले आहे.

coronavirus: 422 patients die of coronavirus in Maharashtra, total 11,119 new patient found today | coronavirus: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज पुन्हा मोठी वाढ, तब्बल ४२२ रुग्णांचा मृत्यू

coronavirus: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज पुन्हा मोठी वाढ, तब्बल ४२२ रुग्णांचा मृत्यू

Next

मुंबई - राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये आज पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवली गेली आहे. आज दिवसभरात राज्यामध्ये कोरोनाचे ११ हजार ११९ रुग्ण सापडले. तसेच गेल्या २४ तासांत राज्यामध्ये तब्बल ४२२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज ९३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात आतापर्यंत कोरोनाचे एकूण ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण बरे झाले आहेत. आज ११ हजार ११९ नविन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५६ हजार ६०८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३२ लाख ६४ हजार ३८४ नमुन्यांपैकी ६ लाख १५ हजार ४७७ नमुने पॉझिटिव्ह (१८.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ११ लाख ३५ हजार ७४९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार १७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे.

राज्यात आज निदान झालेले ११,११९ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४२२ मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९३१ (४९), ठाणे- १३१ (४), ठाणे मनपा-१६४ (१८), नवी मुंबई मनपा-३५२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२१२ (१०), उल्हासनगर मनपा-८ (५), भिवंडी निजामपूर मनपा-९ (२), मीरा भाईंदर मनपा-१५१ (२), पालघर-१०९, वसई-विरार मनपा-१५५ (३), रायगड-२५५ (२५), पनवेल मनपा-१६७ (३६), नाशिक-१५६ (११), नाशिक मनपा-५११ (५), मालेगाव मनपा-३२ (१), अहमदनगर-२२० (७),अहमदनगर मनपा-३१५ (१०), धुळे-६० (२), धुळे मनपा-३६ (२), जळगाव-३९९ (१०), जळगाव मनपा-६८ (१), नंदूरबार-३७ (३), पुणे- ४१८ (१६), पुणे मनपा-१२६७ (५४), पिंपरी चिंचवड मनपा-७४७ (१९), सोलापूर-३२८ (११), सोलापूर मनपा-१०८ (२), सातारा-३५३ (११), कोल्हापूर-३३४ (११), कोल्हापूर मनपा-१३७ (५), सांगली-१५४ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५१ (६), सिंधुदूर्ग-४१ (१), रत्नागिरी-१४० (३), औरंगाबाद-११५,औरंगाबाद मनपा-१३१, जालना-६३, हिंगोली-१९ (२), परभणी-४४ (१), परभणी मनपा-५४, लातूर-८१ (३), लातूर मनपा-१०१ (१), उस्मानाबाद-१०२ (४), बीड-११६ (६), नांदेड-१०६ (२), नांदेड मनपा-१५१, अकोला-२ (२), अकोला मनपा-८ (१), अमरावती-५१ (१), अमरावती मनपा-८२ (३), यवतमाळ-७३, बुलढाणा-१०१ (१), वाशिम-२४, नागपूर-१५६ (७), नागपूर मनपा-६५६ (२७), वर्धा-१४, भंडारा-५५, गोंदिया-२४, चंद्रपूर-९ (१), चंद्रपूर मनपा-७ (१), गडचिरोली-११, इतर राज्य ७ (२).

Web Title: coronavirus: 422 patients die of coronavirus in Maharashtra, total 11,119 new patient found today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.