शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

coronavirus : राज्यात एकाच दिवसात सापडले कोरोनाचे 352 रुग्ण, एकूण आकडा 2334 वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 23:16 IST

राज्यात आज एका दिवसात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा आता 160 वर पोहोचला आहे.

मुंबई - कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढल्याने राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आज एकाच दिवसात राज्यात कोरोनाचे 352 रुग्ण सापडले असून, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2334 वर पोहोचला आहे. तर आज एका दिवसात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 160 झाली आहे. 

राज्यात सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी सर्वाधिक 242 रुग्ण केवळ मुंबईत सापडले आहेत. तर 39 रुग्ण पुण्यात सापडले आहेत. आज राज्यात 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे 9 आणि पिंपरी चिंचवड तसेच मीरा भाईंदर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 11 जणांपैकी 8  रुग्णांमध्ये ( 73 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.  कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 160 झाली आहे. दरम्यान, सध्या राज्यात १९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

कोरोनाचा संशय असलेल्या व्यक्तींच्या आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 43,199 नमुन्यांपैकी 39,089 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 2334 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच आज राज्यातून 229 रुग्णांना ते कोरोनामधून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

काल सोलापूरात पहिला करोना बाधित मृत्यू झाल्यानंतर तेथील आरोग्य यंत्रणा युध्दपातळीवर काम करत असून या रुग्णाच्या निवासी परिसरात ३५,००० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यासाठी ६२ सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. या बाधित रुग्णाच्या अतिजोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत असून आतापर्यंत ७९ निकट सहवासितांना विलग करण्यात आले आहे.

दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजार 352 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे नवे 905 रुग्ण सापडले आहेत. तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 980 जण बरे झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईPuneपुणे