CoronaVirus News: राज्यात ३,३९० नवे रुग्ण, दिवसभरात १२० मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 06:25 IST2020-06-15T06:24:40+5:302020-06-15T06:25:32+5:30
कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७ हजार ९५८

CoronaVirus News: राज्यात ३,३९० नवे रुग्ण, दिवसभरात १२० मृत्यू
मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.२ टक्क्यांवर गेले असले तरी संसर्ग वाढण्याचे प्रमाण कमी होत नसल्याने चिंता वाढली आहे. रविवारी ३ हजार ३९० नव्या रुग्णांचे निदान झाले. दिवसभरात १२० जणांचा मृत्यू झाला.
राज्यातील रुग्णसंख्या एक लाख ७ हजार ९५८ झाली असून मृतांची एकूण संख्या ३ हजार ९५० वर पोहोचली आहे. पुणे विभागात रविवारी एका दिवसात तब्बल ५६१ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामुळे आतापर्यंत विभागात बाधितांची संख्या १५ हजार १९८ वर जाऊन पोहोचली आहे. विभागात सर्वाधिक ११ हजार ८७७ रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. विदर्भात ६७ रुग्ण व ६ मृत्यूची नोंद झाली. यात एकट्या अकोला जिल्ह्यात ५, तर बुलडाणा जिल्ह्यात १ मृत्यू आहे.
दिवसभरातील १२० जणांच्या मृत्यूंमध्ये मुंबई ६९, ठाणे ४, उल्हासनगर ५, पालघर १, वसई-विरार १, पुणे ११, सोलापूर ३, नाशिक ३, जळगाव ११, रत्नागिरी १, औरंगाबाद ७, उस्मानाबाद आणि अकोला येथील प्रत्येकी २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये ८१ पुरुष तर ३९ महिला आहेत.
80,00,000कडे जगाची रुग्णसंख्या
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ८० लाखांच्या जवळ गेली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या रविवारी ४ लाख ३३ हजारांच्या पुढे गेली. जगात जवळपास ४० लाख लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
87000 जण होम क्वारंटाइनमध्ये
आजवर तपासलेल्या सहा लाख ५७ हजार ७३९ नमुन्यांपैकी एक लाख ७ हजार ९५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात पाच लाख ८७ हजार ५९६ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
देशात दुसऱ्या दिवशीही ११ हजारांवर नवे रुग्ण
देशामध्ये शनिवारी कोरोनाचे ११,९२९ नवे रुग्ण आढळून आले, तर ३११ जणांचा बळी गेला.