CoronaVirus: दिलासादायक! राज्यात २९ हजार रुग्णांची कोरोनातून मुक्तता, २४८७ नव्या कोरोनाग्रस्तांचं निदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 10:48 PM2020-05-31T22:48:46+5:302020-05-31T22:49:04+5:30

दरम्यान, आज कोरोनाच्या २४८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

CoronaVirus: 29,000 patients released from corona in the state, 2487 new corona patients diagnosed vrd | CoronaVirus: दिलासादायक! राज्यात २९ हजार रुग्णांची कोरोनातून मुक्तता, २४८७ नव्या कोरोनाग्रस्तांचं निदान 

CoronaVirus: दिलासादायक! राज्यात २९ हजार रुग्णांची कोरोनातून मुक्तता, २४८७ नव्या कोरोनाग्रस्तांचं निदान 

Next

मुंबई : देशात कोरोनानं थैमान घातलेलं असून, अनेक राज्यांमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. राज्यात आज १२४८ रुग्णांना घरी पाठवण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात २९ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २४८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.७ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ४३.३५ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे. राज्यात ८९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.

ठाणे- ७० (मुंबई ५२, ठाणे ५, नवी मुंबई ९,  कल्याण डोंबिवली ४), नाशिक- ६ (मालेगाव ६), पुणे- ११ (पुणे ९, सोलापूर २), लातूर-१ (उस्मानाबाद १), अकोला-१(यवतमाळ १), असे आज नोंद झालेले जिल्हानिहाय मृत्यू आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२८६ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत, तर उर्वरित  मृत्यू हे २७ एप्रिल ते २७ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ५० मृत्यूंपैकी मुंबई २७, नवी मुंबई -९, मालेगाव -६, कल्याण डोंबिवली -४, ठाणे -३, सोलापूर- १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका : बाधित रुग्ण- (३९,६८६), बरे झालेले रुग्ण- (१६,७९१), मृत्यू- (१२७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,६१०)

ठाणे: बाधित रुग्ण- (९५८५), बरे झालेले रुग्ण- (३४००), मृत्यू- (२००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९८५)

पालघर: बाधित रुग्ण- (१०१८), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१०)

रायगड: बाधित रुग्ण- (११०८), बरे झालेले रुग्ण- (५७३), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९४)

नाशिक: बाधित रुग्ण- (११३५), बरे झालेले रुग्ण- (८९३), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२०), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)

धुळे: बाधित रुग्ण- (१४०), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

जळगाव: बाधित रुग्ण- (६१६), बरे झालेले रुग्ण- (२७७), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३५), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

पुणे: बाधित रुग्ण- (७९१९), बरे झालेले रुग्ण- (३६९९), मृत्यू- (३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८९१)

सोलापूर: बाधित रुग्ण- (८९७), बरे झालेले रुग्ण- (३७१), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५६)

सातारा:  बाधित रुग्ण- (५२३), बरे झालेले रुग्ण- (१४८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५९)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४५७), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०३)

सांगली: बाधित रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३३), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५)

रत्नागिरी:  बाधित रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण- (९८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६१)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१५०१), बरे झालेले रुग्ण- (९८६), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५०)

जालना: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१४९), बरे झालेले रुग्ण- (९८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

परभणी: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९)

लातूर: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (१९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

बीड: बाधित रुग्ण- (४७), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३४)

नांदेड: बाधित रुग्ण- (१११), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)

अकोला: बाधित रुग्ण- (५८४), बरे झालेले रुग्ण- (३१९), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३६)

अमरावती: बाधित रुग्ण- (२२६), बरे झालेले रुग्ण- (१२४), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (६२), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)

वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

नागपूर: बाधित रुग्ण- (५७४), बरे झालेले रुग्ण- (३५८), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०६)

वर्धा: बाधित रुग्ण- (१२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११)

भंडारा: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (३२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४)

चंद्रपूर:  बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३५), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४)

एकूण: बाधित रुग्ण-(६७,६५५), बरे झालेले रुग्ण- (२९,३२९), मृत्यू- (२२८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टिव्ह रुग्ण-(३६,०३१)

Web Title: CoronaVirus: 29,000 patients released from corona in the state, 2487 new corona patients diagnosed vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.