शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: राज्यात नवीन १२३० कोरोनाबाधितांची नोंद, एकूण रुग्ण २३,४०१   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 06:41 IST

मुंबई : राज्यात सोमवारी १२३० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने रुग्णांचा आकडा २३ हजार ४०१ इतका झाला आहे. तर, दिवसभरात ...

मुंबई : राज्यात सोमवारी १२३० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने रुग्णांचा आकडा २३ हजार ४०१ इतका झाला आहे. तर, दिवसभरात ५८७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत तब्बल ४,७८६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.दिवसभरात राज्यात ३६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात २३ पुरुष आणि १३ महिलांचा समावेश आहे. या ३६ मृत्यूंपैकी तब्बल १७ जणांचे वय साठहून अधिक होते. १६ जण चाळीस ते साठ या वयोगटातील होते. तर, तीन जण ४० वर्षांखालील आहेत. आज ३६ मृतांपैकी २७ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृतांमध्ये मुंबईमध्ये २०, सोलापूर शहर ५, पुणे ३, ठाणे २, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, वर्धा जिल्हा आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमधील एकाचा मुंबईत बळी गेला आहे.आतापर्यंत प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या २,१८,९१४ नमुन्यांपैकी १,९३,४५७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर २३,४०१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १,२५६ कंटेनमेंट झोन क्रियाशील आहेत. सोमवारी एकूण १२,०२७ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५३.७१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.देशात ४२१३ नवीन रुग्ण24 तासांमध्ये देशात नव्या ४२१३ रुग्णांची नोंद झाली. काही राज्ये माहिती देण्यास विलंब करीत असल्याने एका दिवसात हा आकडा वाढलेला दिसतो, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव अगरवाल यांनी स्पष्ट केले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३१.१५% आहे. आरोग्य सेतू अ‍ॅपवरून कुणाचीही खासगी माहिती केंद्राकडे जमवली जात नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. हे अ‍ॅप पूर्णपणे सुरक्षित आहे. कोरोनाचा प्रसार रोखणे, लोकांना सतर्क करणे, त्यांना कोरोनापासून वाचवणे हेच आरोग्य सेतू अ‍ॅपच्या निर्मितीमागचे हेतू आहेत.284000 जगभरात मृत्यूकोरोनाने जगभरात आतापर्यंत२ लाख ८४ हजार ७३४ जणांचा बळी घेतला असून, एकट्या अमेरिकेतच ८० हजार ८४६ जण मरण पावले आहेत. आतापर्यंत १५ लाख ६ हजार ४७९ जण बरेही झाले आहेत. मात्र चार दिवसांपासून रशियात रुग्णांची संख्या १० ते ११ हजारांनी वाढत असून, तेथील रुग्णसंख्या आता सुमारे २ लाख २१ हजारांवर गेली आहे. अमेरिकेत १३ लाख ७० हजार रुग्ण आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत