CoronaVirus राज्यात १ हजार २०५ कोरोनाबाधित; बुधवारी ११७ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 06:50 AM2020-04-09T06:50:47+5:302020-04-09T06:51:07+5:30

आठ कोरोनाबाधित मृत्यूंची नोंद, एकूण मृतांची संख्या ७५ वर

CoronaVirus 1205 patient in the state; 117 new patients on Wednesday | CoronaVirus राज्यात १ हजार २०५ कोरोनाबाधित; बुधवारी ११७ नवे रुग्ण

CoronaVirus राज्यात १ हजार २०५ कोरोनाबाधित; बुधवारी ११७ नवे रुग्ण

Next

मुंबई : राज्यात बुधवारी ११७ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १,२०५ झाली आहे. राज्यात आठ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. त्या मृत्यूंपैकी ५ मुंबईत, २ पुणे येथे तर १ कल्याण डोंबिवलीमधील आहे. पाचपैकी दोन मृत्यू बुधवारी झाले असून त्यातील एक मुंबई व एक पुण्याचा आहे. त्यामुळे कोविड-१९ मुळे राज्यात आजवर झालेल्या मृत्यूंची संख्या आता ७५ झाली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २७,०९० नमुन्यांपैकी २५,७५३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले आहेत तर १,१३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ११७ करोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३४,९०४ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४४४४ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दिल्लीत सहभागींपैकी २५ जण
कोरोनाबाधित, आकडा वाढतोय
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महापालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी २५ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, बुलढाणा जिल्ह्यात ६ आणि प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव आणि वाशीममधील आहे.

१२ लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. सध्या मुंबईत ६४५, बुलढाणा १९८, वसई विरारमध्ये १८३, मीरा भाईंदर मनपामध्ये २०० तर ठाणे मनपामध्ये ३३१ सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. राज्यात या प्रकारे एकूण ३,६५८ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १२ लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

Web Title: CoronaVirus 1205 patient in the state; 117 new patients on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.