शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
7
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
8
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
9
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
10
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
11
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
12
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
13
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
14
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
15
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
16
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
17
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
18
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
19
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
20
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव

Coronavirus: कोरोना लढ्यात राज्याला हवेत १२ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 06:26 IST

आरोग्य व्यवस्थेचे हाेईल बळकटीकरण. राज्यातील आरोग्य व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना महामारीचा समर्थपणे मुकाबला केला जाईल.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राला हजारो कोटींचा निधी उभारावा लागणार आहे. आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासोबतच वैद्यकीय औषधे, सामग्रीसाठी या वर्षी तब्बल १२ हजार कोटींचा निधी उभारावा लागणार आहे.

कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींसोबतच एकूण १२ हजार कोटींच्या निधीची आवश्यकता भासणार आहे. यातून औषधे आवश्यक सामग्रीसोबतच आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीसाठी हा निधी लागेल. मागच्या वर्षी महामारीला रोखण्यासाठी सहा हजार कोटींचा निधी खर्च केल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी सांगितले.

राज्यातील आरोग्य व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना महामारीचा समर्थपणे मुकाबला केला जाईल. राज्य आपत्ती निवारण निधीतून २१०० कोटींचा निधी प्रस्तावित आहे. तर, मुख्यमंत्री सहायता निधीतून २३६ कोटी आहेत. जिल्हा विकास निधीतून ३,३०० कोटींसोबतच विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होईल. 

अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ३३६ कोटींचा निधी वापरण्याची घोषणा केली होती. प्रत्येक आमदाराने आपल्या निधीतून एक कोटी दिल्यास ३३६ कोटीचा निधी उभारला जाईल. हा निधी त्या त्या मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी वापरला  जाईल.

आमदार निधीचा विचार प्रत्येक आमदाराने आपल्या निधीतून एक कोटी दिल्यास ३३६ कोटीचा निधी उभारला जाईल. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ३३६ कोटींचा निधी वापरण्याची घोषणा केली होती.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस