CoronaVirus : राज्यात 1130 नवे करोनाबाधित, दिवसभरात 2148 जण ठणठणीत होऊन घरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 00:18 IST2021-10-31T00:17:28+5:302021-10-31T00:18:18+5:30
राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 66,09,906 झाली आहे. तर, राज्यात एकूण 140196 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

CoronaVirus : राज्यात 1130 नवे करोनाबाधित, दिवसभरात 2148 जण ठणठणीत होऊन घरी
मुंबई - कोरोना व्हायरसच्या (CoronaVirus) दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशातच धुमाकूळ घातला होता. महाराष्ट्रालाही याचा मोठा फटका बसला. मात्र, आता राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दैनंदिन कोरोना बाधितांची संख्याही आता सातत्याने कमी होत चालली आहे. आज राज्यात 1 हजार 130 नवे करोनाबाधित समोर आले असून 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 2 हजार 148 रूग्ण कोरोनावर मात करत ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. (Coronavirus in Maharashtra)
राज्यातील एकूण करोना बाधितांचा आकडा 66,09,906 वर -
राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आता 66,09,906 झाली आहे. तर, राज्यात एकूण 140196 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे. दिलासादयक गोष्ट म्हणजे, आजपर्यंत राज्यातील एकूण 64,49,186 करोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. याच बरोबर राज्यातील रिकव्हरी रेट 97.57 टक्क्यांवर पोहोचला आहे.
एकूण 16,905 जण सक्रिय -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या 1,67,064 लोक होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 897 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण 6,25,59,171 नमुन्यांपैकी, एकूण 66,09,906 (10.57 टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आज रोजी राज्यात एकूण 16,905 लोक सक्रिय आहेत.