शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
6
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
7
आयोग नव्हे, मतदारच राजा !
8
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
9
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
10
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
11
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
12
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
13
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
14
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
15
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
16
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
17
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
18
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
19
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
20
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

CoronaVirus : राज्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाचे निदान, रुग्णसंख्या 11506 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 21:30 IST

CoronaVirus: मुंबईत शुक्रवारी 751 इतक्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या 7 हजार 812 वर पोहोचली आहे.

मुंबई : राज्यात आज १०६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत १००८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ११ हजार ५०६ झाली आहे. तर एकूण  ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ५३ हजार १२५ नमुन्यांपैकी १ लाख ४० हजार ५८७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ११ हजार ५०६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६३ हजार २६ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ११ हजार ६७७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

आज राज्यात २६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ४८५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी पुणे शहरातील १०, मुंबईचे ५, जळगाव जिल्ह्यातील ३ तर पुणे जिल्ह्यातील १, सिंधुदुर्ग मधील १, भिवंडी महानगरपालिकेतील १, ठाणे मनपामधील १, नांदेड मधील १,औरंगाबाद मनपामधील १ तर १ मृत्यू परभणी येथील आहे. या शिवाय उत्तर  प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १८ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या २६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४  रुग्ण आहेत तर ११  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर एक जण ४० वर्षांखालील आहे.  या २६ रुग्णांपैकी १५ जणांमध्ये (५८  टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)मुंबई महानगरपालिका: ७८१२ (२९५)ठाणे: ५१ (२) ठाणे मनपा: ४३८ (७)नवी मुंबई मनपा: १९३ (३)कल्याण डोंबिवली मनपा: १७९ (३)उल्हासनगर मनपा: ३भिवंडी निजामपूर मनपा: १७ (१)मीरा भाईंदर मनपा: १३५ (२)पालघर: ४४ (१)वसई विरार मनपा: १३५ (३)रायगड: २६ (१)पनवेल मनपा: ४८ (२)ठाणे मंडळ एकूण: ९०८१ (३२०)नाशिक: ६नाशिक मनपा: ३५मालेगाव मनपा:  २०१ (१२)अहमदनगर: २६ (२)अहमदनगर मनपा: १६धुळे: ८(२)धुळे मनपा: १८ (१)जळगाव: ३४ (११)जळगाव मनपा: १० (१)नंदूरबार: ११ (१)नाशिक मंडळ एकूण: ३६५ (३०)पुणे:६८ (४)पुणे मनपा: ११७६ (९२)पिंपरी चिंचवड मनपा: ७२ (३)सोलापूर: ७सोलापूर मनपा: १०१ (६)सातारा: ३२ (२)पुणे मंडळ एकूण: १४५६ (१०७)कोल्हापूर: ९कोल्हापूर मनपा: ६सांगली: २९सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)सिंधुदुर्ग: २ (१)रत्नागिरी: ८ (१)कोल्हापूर मंडळ एकूण: ५५ (३)औरंगाबाद:२औरंगाबाद मनपा: १५९ (८)जालना: ३हिंगोली: २२परभणी: १ (१)परभणी मनपा: २औरंगाबाद मंडळ एकूण: १८९ (९)लातूर: १२ (१)लातूर मनपा: ०उस्मानाबाद: ३ बीड: १नांदेड: ०नांदेड मनपा: ४लातूर मंडळ एकूण: २० (२)अकोला: १२ (१)अकोला मनपा: २७अमरावती: २अमरावती मनपा: २६ (७)यवतमाळ: ७९बुलढाणा: २१ (१)वाशिम: २अकोला मंडळ एकूण: १६९ (९)नागपूर: ६नागपूर मनपा: १३३ (२)वर्धा: ०भंडारा: १गोंदिया: १चंद्रपूर: ०चंद्रपूर मनपा: ३गडचिरोली: ०नागपूर मंडळ एकूण: १४४ (२)इतर राज्ये: २७ (३)एकूण:  ११,५०६  (४८५)( टीप – ही माहिती कोरोना पोर्टलवरील आय सी एम आरने दिलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे. )राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या ७९२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १० हजार ८४९ सर्वेक्षण पथकांनी  काम केले असून त्यांनी ४५.३४ लाख  लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र