शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

Corona virus :राज्यात वाहन विक्रीत पुणेच आघाडीवर; त्या पाठोपाठ पिंपरी चिंचवडचा क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 02:28 IST

पुण्यात एकट्या मार्च महिन्यातच जवळपास २१ हजार वाहनांची विक्री झाली होती.

ठळक मुद्देराज्यात मुंबई,ठाणे पाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण

पुणे : कोरोना संकटामुळे वाहन विक्रीत तब्बल ७० टक्के घट झाली आहे. राज्यात मुंबई व ठाण्यानंतर पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीतही राज्यात पुण्यातच सर्वाधिक वाहन विक्री झाली आहे. तर त्या पाठोपाठ पिंपरी चिंचवडचा क्रमांक लागतो. दरवर्षी राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) पुणे कार्यालयामध्ये (एमएच १२) सर्वाधिक वाहन नोंदणी आणि महसुुल जमा होतो. मागील वर्षी पुण्यात २ लाख ४४ हजार ९८३ वाहनांची विक्री झाली होती. राज्याच्या तुलनेत हे प्रमाण १० टक्के एवढे आहे. राज्यात जवळपास ५० आरटीओमधून सुमारे २३ लाख १० हजार वाहनांची नोंद झाली होती. यावर्षी मार्च महिन्यापर्यंत वाहन विक्री जोमाने सुरू होती. पण मार्च अखेरीस लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मे महिन्यापर्यंत वाहन विक्री जवळपास ठप्प झाली. जून महिन्यात कार्यालये पुन्हा सुरू झाल्यानंतर वाहन खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडू लागले. पुण्यामध्ये मुंबई व ठाण्यापाठोपाठ कोरोनाचे संकट गडद असल्याने वाहन विक्रीवर विपरीत परिणाम दिसून आला. पण तरीही अन्य ‘आरटीओ’च्या तुलनेत पुण्यात सर्वाधिक वाहन विक्री झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. 

पुण्यात एकट्या मार्च महिन्यातच जवळपास २१ हजार वाहनांची विक्री झाली होती. तर एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीत पुण्यात सुमारे साडे बारा हजार वाहनांची नोंदणी झाली. त्यापाठोपाठ पिंपरी चिंचवड ८,७३७, नाशिक ६,९७८, कोल्हापूर ४,१९१ आणि ठाणे ४२६० या आरटीओचा क्रमांक लागतो. पुण्यात कोरोना रुग्णसंख्या अधिक असूनही सर्वाधिक वाहन विक्री होत असल्याचे चित्र आहे. -------------  मागील वर्षीच्या तुलनेत ७० टक्के घटकोरोनामुळे देशभरातील वाहन विक्रीत ६५ ते ७० टक्के घट दिसून आहे. तेच चित्र महाराष्ट्र आणि पुण्यातही पाहायला मिळत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात आतापर्यंत वाहन विक्रीत ६५ टक्क्यांनी तर पुण्यात ७० टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यात जानेवारी ते जुलै या कालावधीत सुमारे पाऊण लाख वाहनांचीच विक्री झाली आहे.------------------एप्रिल ते जुलै (दि. २३ जुलैपर्यंत) कालावधीतील वाहन विक्री(स्त्रोत - वाहन डॅशबोर्ड)आरटीओ वाहन विक्रीपुणे (१२) १२,६२९पिंपरी चिंचवड (१४) ८,७३७नाशिक (१५) ६,९७८कोल्हापूर (९) ४,१९१ठाणे (४) ४२६०-------------------------पुण्यातील (एमएच १२) वाहन विक्री (स्त्रोत - वाहन डॅशबोर्ड)महिना वाहन विक्रीजानेवारी २३,४४४फेब्रुवारी १७,०६५मार्च २०,८०६एप्रिल १,०३४मे ६५८जून ५,९३४जुलै ५,००३-------------------एकुण १२,६२९-------------------

 

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस