शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

Corona virus : कोरोनाला रोखण्यासाठी चाचण्या वाढविणे आणि रूग्णांचे विलगीकरण गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 5:34 PM

संसर्ग कमी करण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा..

ठळक मुद्देशास्त्रज्ञांच्या गटाचा निष्कर्ष : इंडिया सिम हे गणितीय प्रतिमान विकसितदेशातील अनेक राष्ट्रीय संशोधन संस्था आणि विद्यापीठांमधील आघाडीच्या संशोधकांचा समावेश

पुणे : लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर मंदावला आहे. पण मोठ्या कालावधीच्या लॉकडाऊनचा फायदा होण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणावर केलेल्या चाचण्या आणि आढळून आलेल्या रूग्णांचे विलगीकरण यांचीही जोड गरजेची आहे. चाचण्या वाढविल्यामुळे बाधित लोक अधिक प्रमाणावर समोर येतील. त्यामुळे संसर्ग आटोक्यात आणता येऊ शकेल, असा निष्कर्ष 'इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टू कोविड' या शास्त्रज्ञांच्या गटाने काढला आहे. या गटाने विकसित केलेल्या इंडिया-सिम या गणितीय प्रतिमानानुसार करण्यात आलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष निघाला आहे.कोरोनाशी लढण्यासाठी सुरू केलेल्या विविध प्रयत्न करणे तसेच कोरोना प्रसाराचे गणिती प्रतिमान तयार करण्यासाठी 'इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टू कोविड' या गटाची स्थापना करण्यात आली आहे. देशातील अनेक राष्ट्रीय संशोधन संस्था आणि विद्यापीठांमधील आघाडीच्या संशोधकांचा यामध्ये समावेश आहे. यातील गणिती प्रतिमानाचे काम करणाऱ्या उपगटाचे नेतृत्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशनचे (सीएमएस) डॉ. भालचंद्र पुजारी आणि डॉ. स्नेहल शेकटकर हे करत आहेत. चेन्नई येथील गणितीय विज्ञान संस्था आणि बेंगालूरू येथील भारतीय विज्ञान संस्था यांच्या शास्त्रज्ञांचा देखिल या गटात समावेश आहे. या गटाने ' इंडिया सिम' हे भारतातील रोगप्रसाराचा अभ्यास करण्यासाठीचे गणितीय प्रतिमान विकसित करण्यात आले असून, भारतासाठीचे आत्तापर्यंतचे हे सर्वांत व्यापक प्रतिमान आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.या प्रतिमानाचा उपयोग शहरे, जिल्हे आणि राज्य अशा विविध पातळ्यांवर आरोग्यसेवांशी संबंधित संसाधनांचे आणि विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी करता येणार आहे. त्यासाठीचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. साथीवर वेगवेगळ्या प्रकारचे लॉकडाउन, संशयित किंवा बाधीतांचे विलगीकरण, रोगाच्या चाचण्यांची संख्या इत्यादी गोष्टींचा कसा परिणाम होऊ शकेल याची तुलना करणे शक्य होणार आहे. प्रतिमानामुळे पुढे आपल्याला किती खाटांची आणि अतिदक्षता विभागांची गरज पडेल याचा अंदाज बांधता येणार आहे.-------------------संसर्ग कमी करण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे. पण केवळ जास्त कालावधीचा लॉकडाऊन असल्याने संसर्ग थांबणार नाही. त्यासाठी ठराविक झोनमधील चाचण्या मोठ्या प्रमाणावर कराव्या लागतील. चाचण्या केल्यामुळे बाधित रुग्ण समोर येतील. ते जेवढे जास्त आढळतील, तेवढे संसर्ग कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यांची चाचणी केली नाही, तर ते इतरांना बाधित करण्याचा धोका असतो. त्यांच्यामुळे ही साखळी आणखी वाढत जाते. त्यामुळे लोकांना शोधून त्यांच्या चाचण्या करायला हव्यात. तरच लॉकडाऊनचा कालावधी कमी करता येईल. याचप्रमाणे ग्रीन झोनमधील लॉकडाऊनची स्थिती, वाहतुक यंत्रणा, शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील संसर्ग, सुविधा आदी बाबींचाही अभ्यास केला जात आहे.- डॉ. स्नेहल शेकटकरसदस्य, इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टू कोविड---------------------—

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर