शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

Corona virus : ‘बंद’चा फायदा नाते जपण्यासाठी घ्या : मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 13:34 IST

आई-वडिलांना भेटा, मुलांबरोबर गप्पा मारा, खेळही खेळा

ठळक मुद्देमनावरचा ताण कमी करायचा असेल, तर त्यासाठी सुसंवाद असणे गरजेचेसार्वजनिक ‘बंद’वर टीका करण्याऐवजी त्याचा आपण सदुपयोग नक्कीच करून घेऊ राहून गेलेल्या गोष्टींना वेळ द्या

पुणे : तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या अगदी शेजारी बसून, त्यांचे हात हातात घेऊन शांतपणे बोलला त्याला किती दिवस झाले? मुलांबरोबर काही खेळ खेळलात, ते आठवते आहे का? बायकोला घरकामात शेवटची मदत कधी केली होती! पाहा बरं थोडं आठवून!  या सगळ्या प्रश्नांची अनेकांच्या बाबतीत नकारार्थी असलेली उत्तरे सकारात्मक करण्याची संधी आहे. कोरोनामुळे झालेल्या ‘बंद’मधून ही संधी आली असल्याचे बहुसंख्य मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे.कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारी यंत्रणेने अनेक पावले उचलली आहेत. त्यात प्रामुख्याने सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवण्यात आले आहेत. शाळा, चित्रपटगृह, नाट्यगृह, जाहीर सभा, संवाद, मुलाखती असे सगळे काही बंद आहे. इतकेच नव्हे तर शाळांपासून ते महाविद्यालयांपर्यंतच्या परीक्षाही काही कालावधीपुरत्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. कुठेही जाऊ नका, अनावश्यक फिरू नका, असे आवाहन सरकारने केले आहे. याचा सरळ अर्थ सगळे काही बंद करून घरात बसा असाच आहे. फक्त बसून करायचे काय, असा प्रश्न त्यातूनच निर्माण झाला आहे.त्यावरच काही मानसोपचार तज्ज्ञ; तसेच डॉक्टरांबरोबर संवाद साधला असता त्यांनी ही तर मोठीच संधी आहे, असे मत व्यक्त केले.  समुपदेशक डॉ. श्रुती पानसे म्हणाल्या, ही संधी आहे आपल्याच मुलांना वेळ देण्याची, त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची. इतर वेळी कामाचा व्याप, कामाचा ताण यामुळे मुलांना क्वॉलिटी टाइम देता येत नाही. आपण घरी, तर मुले झोपलेली व आपण जागे, तर ती शाळेत गेलेली असेच होत असते. आता सगळेच घरी, तर त्यांच्याबरोबर बसा, फक्त बसाच नाही तर त्यांच्याबरोबर खेळा, त्यांना हस्तकला, चित्रकला, शिल्पकला असे काहीतरी करायला शिकवा व तुम्हीही शिका. बोटांचा वापर फक्त मोबाईलसाठी असेच काहीसे झाले आहे. बोटं वापरून कातरकाम, चिकटवही, शिल्प, चित्र करता येतात, अन्यही बरेच काही करता येते हे मुलांना यानिमित्ताने सांगता येईल, दाखवता येईल.चौकोनी किंवा हल्ली तर त्रिकोणी कुटुंबव्यवस्थेमुळे तरुण पिढीसाठी त्यांच्या आईवडिलांचे वेगळे व स्वतंत्र असे जग झाले आहे. त्यांचाच मुलगा त्यांना कित्येक दिवस भेटत नाही, भेटला तरी बोलत नाही, बोलला तरी त्यात संवाद नसतो तर फक्त विचारापासून व तीसुद्धा कोरडीच असाच अनेकांचा अनुभव आहे. तो बदलण्याची संधी या सार्वजनिक ‘बंद’मुळे आली असल्याचे काही मानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे........मनाचे आरोग्य सुधारेलमनावरचा ताण कमी करायचा असेल, तर त्यासाठी सुसंवाद असणे गरजेचे असते. हे फक्त नात्यापुरतेच नाही, तर मित्र-मैत्रिणींसाठीही तेवढेच गरजेचे आहे. नेमका हा सुसंवादच आपण मोबाईल किंवा संगणकाच्या पडद्याबरोबर मैत्री केल्यामुळे हरवला आहे. या सार्वजनिक ‘बंद’वर टीका करण्याऐवजी त्याचा आपण सदुपयोग नक्कीच करून घेऊ शकतो. हाही वेळ पुन्हा मोबाईलवर किंवा कोणत्याही स्क्रीनवर घालवू नका, असे माझे आवाहन आहे. घरातल्यांबरोबर बोला, नातेवाइकांबरोबर बोला, बोलत राहा.-डॉ. हिमानी कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ..........राहून गेलेल्या गोष्टींना वेळ द्याफक्त मुले किंवा आईवडिलांबरोबरच बोला असे नाही, तर तुमची, तुम्हाला करावे असे वाटलेली पण करता आली नाही अशी कोणतीही गोष्ट तुम्ही या काळात करू शकता. त्यात गाणी ऐकणे व वाचन-लेखन करणेही आले. वेळ मिळाला आहे तर तो सर्वांबरोबर घालवा, तसेच स्वत:लाही द्या. मनाच्या आरोग्यासाठी तेही गरजेचेच असते.-डॉ. श्रुती पानसे, समुपदेशक 

........

स्वत:चा शोध घेणे ही बहुतेकांना आध्यात्मिक गोष्ट वाटेल; मात्र ती मनाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. असा वेळ आपण आपल्याला कधीच देत नाही, तो या सार्वजनिक ‘बंद’मुळे देता येईल. यातून तुम्ही तुमच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घ्या, त्यातून मग एक चांगले तुम्हाला योग्य वाटेल असे वेळापत्रक तयार करा. पहिल्या टप्प्याचा विचार करतानाच तुमच्या लक्षात येईल की तुम्ही घरात किंवा नात्यात काहीच वेळ देत नाही आहात. तेवढे उमजले की मग पुढचे सगळे आपोआप होईल.    - डॉ. भूषण म्हेत्रे, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसायjobनोकरीState Governmentराज्य सरकारrelationshipरिलेशनशिप