शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Corona Virus : दिलासा; राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 08:34 IST

Corona Virus: सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,१९,२२४ झाली असून, मृतांचा एकूण आकडा ९९ हजार ५१२ आहे.

ठळक मुद्देदिवसभरात नोंद झालेल्या एकूण ३०० मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर, ८९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

मुंबई : राज्यात शनिवारी १३,६५९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, ३०० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०१ टक्के एवढे झाले आहे. तीन महिन्यात सर्वात कमी नोंद आहे.  सध्या १ लाख ८८ हजार २७ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१ टक्के एवढा आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८,१९,२२४ झाली असून, मृतांचा एकूण आकडा ९९ हजार ५१२ आहे. तपासण्यात आलेल्या ३,६२,७१,४८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.०४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १४,००,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर, ७,०९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील २१ जिल्ह्यात शनिवारी एकही दैनंदिन मृत्यूची नोंद झालेली नसल्याचे दिसून आले. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ३०० मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर, ८९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

मुंबईत वाढले ८६६ रुग्णमुंबई :  दिवसभरात ८६६ रुग्ण वाढले असून २९ मृत्यू झाले आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९५ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५११ दिवसांवर पोहोचला आहे. २९ मे ते ४ जूनपर्यंत मुंबईतील एकूण  रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्के आहे.मुंबईत रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मागील २४ तासांत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १ हजार ४५ आहे, तर आतापर्यंत एकूण ६ लाख ७७ हजार ६४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहर उपनगरात सध्या १६ हजार १३३ सक्रिय रुग्ण आहेत.मुंबईत ७ लाख १० हजार ८०७ कोरोनाबाधित असून, मृतांची संख्या १५ हजार १८ आहे. दिवसभरात २६ हजार ६६९ चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण ६३ लाख ९८ हजार ६६५ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील चाळ व झोपडपट्टीच्या परिसरात २७ सक्रिय कंटेन्मेंट झोन आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ११६ आहे.

राज्यातील २ कोटी ३७ लाख लाभार्थ्यांना लसमुंबई : राज्यात शुक्रवारी ३ लाख ७२ हजार ५२८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण २ कोटी ३७ लाख ७ हजार ७५८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.राज्यात १२ लाख ४ हजार ७५४ आराेग्य कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला, तर ७ लाख ४३ हजार ५९६ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. राज्यात १८ लाख ५१ हजार ७४० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ७ लाख ८६ हजार ४९९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला.राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १५ लाख ७ हजार ६०५ लाभार्थ्यांना पहिला, तर १२,१०० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ४४ लाख १० हजार २२२ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर ३१ लाख ९१ हजार २४२ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. मुंबईत आतापर्यंत ३६ लाख ३५ हजार ३५५ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्याखालोखाल पुण्यात ३० लाख ५० हजार ३१९, नागपूरमध्ये १३ लाख १२ हजार १८४, ठाण्यात १७ लाख ७४ हजार ६९१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र