शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, पोलीस तपासात संतापजनक प्रकार उघड
5
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
6
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
7
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
8
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
9
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
10
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
11
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
12
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
13
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
14
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
15
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
16
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
17
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
18
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
19
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
20
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी

Corona virus : राज्यातील आरटीओच्या कर्मचाऱ्यांना नाही विमा 'कवच'! आपत्कालीन सेवा देऊनही वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 16:50 IST

राज्यात साडेतीन हजार कोरोना योद्धे कार्यरत 

ठळक मुद्देमंजूर पदांपैकी ४० टक्क्यांपर्यंत पदे रिक्तसध्या उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा ताण

नारायण बडगुजरपिंपरी : कोरोना महामारीत आपत्कालीन सेवा देणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय विभातील कर्मचारी, पोलीस आदींना कोरोना योद्धा म्हणून गौरविले जात आहे. शासनाने त्यांना विमा संरक्षण दिले आहे. मात्र, परिवहन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्कालीन सेवा देऊनही विमा सुरक्षा कवचापासून वंचित राहावे लागत आहे. 

मोटार वाहन विभागांतर्गत १५ प्रादेशिक परिवहन, तर ३५ उपप्रादेशिक परिवहन अशी आरटीओची ५० कार्यालये आहेत. राज्यात साडेतीन हजारांपर्यंत अधिकारी व कर्मचारी कार्यरत कोरोना योद्धे म्हणून कार्यरत आहेत. मंजूर पदांपैकी ४० टक्क्यांपर्यंत पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा ताण आहे.

कोरोना महामारीत रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, त्यांना जीपीएस बसवून देणे, औषधांच्या वाहतुकीसाठी वाहने उपलब्ध करून देणे, वंदे भारत मिशनच्या अंतर्गत परदेशातून विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी वाहनांची उपलब्धता, विमानतळावर पोलीस व प्रशासनाच्या संबंधित पथकासोबत आरटीओचे पथक, मालवाहतुकीचे ई-पास देणे, परराज्यांत अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागणीनुसार वाहने उपलब्ध करून देणे, आदी जबाबदारी पार पाडली जात आहे.

पुणे विभागात ४११ अधिकारी, कर्मचारीपुणे विभागात पुणे येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड, बारामती, अकलूज व सोलापूर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. त्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) एक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाच, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सहा, मोटार वाहन निरीक्षक एक, निरीक्षक ७५, मुख्य लेखापाल दोन, सहायक निरीक्षक १३५, उपलेखापाल आठ, वरिष्ठ लिपिक ३५, लिपिक ११६, वाहनचालक १०, वर्ग ड कर्मचारी १६, सांख्यिकी सहायक दोन असे एकूण ४११ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

चौघांना कोरोनाचा संसर्गठाणे येथील एका लिपिकाला कार्यालयात कार्यरत असताना कोरोनाचा संसर्ग झाला. तसेच त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली. यात या पती-पत्नीचा मृत्यू झाला. तसेच वरळी येथील एका वरिष्ठ लिपिक व कंत्राटी वाहनचालक, तसेच पुणे येथील एका कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याने आरटीओ कार्यालयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

राज्याला महसुलाची आवश्यकता असल्याने शासनाच्या धोरणांना सुसंगत अशीच कर्मचारी संघटनेची भूमिका आहे. सध्याच्या परिपत्रकानुसार कोरोना संदर्भातील कामासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोविड bअंतर्गत ५० लाखांचे विमा संरक्षण आहे. मात्र, आरटीओच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसून, ते विमा संरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे. - सुरेंद्र सरतापे, सरचिटणीस, मोटार वाहन विभाग, कर्मचारी संघटना (मुंबई) 

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसEmployeeकर्मचारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार