corona virus : मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी पोहोचला शंभर दिवसांवर, 'या' चतु:सूत्रीमुळे यश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 03:40 AM2020-10-22T03:40:11+5:302020-10-22T07:01:55+5:30

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २५ ऑगस्ट रोजी ९३ दिवस होता. त्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढल्याने १४ सप्टेंबर रोजी तो ५४ दिवस झाला.

corona virus In Mumbai the duration of double sickness has reached 100 days | corona virus : मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी पोहोचला शंभर दिवसांवर, 'या' चतु:सूत्रीमुळे यश

corona virus : मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी पोहोचला शंभर दिवसांवर, 'या' चतु:सूत्रीमुळे यश

Next

मुंबई : चेस द व्हायरस, मिशन झीरो, ट्रेसिंग-ट्रॅकिंग-टेस्टिंग-ट्रीटिंग या चतु:सूत्रीनुसार करण्यात येत असलेली कार्यवाही; ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम, पोलिसांच्या मदतीने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधविषयक बाबी आणि मुंबई पालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे मुंबईत कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला आहे. बुधवारी रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने पहिल्यांदाच तब्बल १०२ दिवसांचा टप्पा गाठला. रुग्णवाढीचा वेग १.२२ वरून ०.६९ टक्क्यांवर आला आहे.

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २५ ऑगस्ट रोजी ९३ दिवस होता. त्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढल्याने १४ सप्टेंबर रोजी तो ५४ दिवस झाला. १ ऑक्टोबरला तो ६६ दिवस, १० ऑक्टोबरला ६९, तर २१ ऑक्टोबरला १०२ दिवस एवढा नोंदविण्यात आला. १० ते २१ ऑक्टोबर या साधारणपणे १० दिवसांच्या कालावधीत रुग्णदुपटीचा कालावधी ६९ दिवसांवरून ३१ दिवसांनी वाढून १०२ दिवस झाला आहे.

मुंबईतील २४ विभागांपैकी ३ विभागांत रुग्णदुपटीचा कालावधी १५० दिवसांपेक्षा अधिक आहे. ११ विभागांमध्ये तो १०० दिवसांपेक्षा अधिक आहे. तो १५० दिवसांपेक्षा अधिक असणाºया ३ विभागांमध्ये जी दक्षिण विभागातील रुग्णदुपटीचा कालावधी सर्वाधिक म्हणजे १७५ दिवस आहे. त्याखालोखाल इ विभागात १६०, तर एफ दक्षिण विभागात १५७ दिवस आहे. ३ विभागांव्यतिरिक्त इतर ११ विभागांमध्ये रुग्णदुपटीचा कालावधी १०० दिवसांपेक्षा अधिक आहे. या ११ विभागांमध्ये बी विभागात तो १३७, जी उत्तर विभागात १३६ आणि एम पूर्व व ए विभागात १३५ दिवस इतका आहे.

रुग्णदुपटीचा कालावधी म्हणजे काय?
कोरोना संसर्गाचे विश्लेषण करताना त्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रुग्ण दुप्पट होण्याचे दिवस म्हणजेच कालावधी जेवढा अधिक तेवढी ही बाब अधिक सकारात्मक असते. ही आकडेवारी एका आठवड्याच्या म्हणजेच ७ दिवसांच्या कालावधीच्या आकडेवारीचे केलेले सांख्यिकीय विश्लेषण असते.

‘मिशन झीरो’ हे ध्येय
मुंबईकरांच्या सहकार्यामुळेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बळ मिळत आहे. ‘मिशन झीरो’ हे आपले ध्येय आहे. ते गाठण्यासाठी सर्वांनीच आपापल्या स्तरावर अधिक प्रयत्न करायचे आहेत.
- इक्बाल सिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका
 

Web Title: corona virus In Mumbai the duration of double sickness has reached 100 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.