CoronaVirus in Maharashtra : राज्यात दिवसभरात कोरोनाचे ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 04:59 IST2021-04-14T04:58:42+5:302021-04-14T04:59:01+5:30
Corona Virus in Maharashtra: दिवसभरात ३१,६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २८,६६,०९७ बाधितांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.४४ टक्के तर मृत्युदर १.६६ टक्के आहे.

CoronaVirus in Maharashtra : राज्यात दिवसभरात कोरोनाचे ६० हजारांहून अधिक नवे रुग्ण
मुंबई : राज्यात सोमवारी ६०,२१२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, २८१ काेरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातील काेरोनाबाधितांची एकूण संख्या ३५,१९,२०८ झाली असून, मृतांचा आकडा ५८ हजार ५२६ झाला आहे. सध्या राज्यात ५,९३,०४२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.
दिवसभरात ३१,६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २८,६६,०९७ बाधितांनी कोरोनावर मात केली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.४४ टक्के तर मृत्युदर १.६६ टक्के आहे. आजपर्यंत तपासलेल्या २,२५,६०,०५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले . सध्या राज्यात ३२,९४,३९८ व्यक्ती होम क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत, तर ३०,३९९ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरण्टाइनमध्ये आहेत.