शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Corona virus : राज्यातील पाच कारागृहांमध्ये पूर्णत: ‘लॉकडाऊन’; राज्य कारागृह महानिरीक्षकांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 21:07 IST

लॉकडाऊन काळात जो अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कारागृहात कार्यरत आहे त्यांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना पुन्हा ड्युटीवर हजर करण्याच्या सूचना.

ठळक मुद्देन्यायालयाचे 7वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे आदेश

पुणे : राज्यात दरदिवशी वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या संसर्गाने सर्वांसमोर गंभीर प्रश्न उभा केला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस प्रशासन, राज्य प्रशासन अखंडपणे कार्यरत आहे. कारागृहात देखील कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या कैद्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यापुढील काळात मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह आणि कल्याण जिल्हा कारागृह ‘लॉकडाऊन’ करण्यात येणार आहेत. असा आदेश राज्याचे कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी राज्यातील कारागृह प्रशासनाला दिले आहेत.मात्र, या कालावधीत न्यायालयाने सांगितल्यानुसार कैदी सोडण्याची प्रक्रिया मात्र सुरू राहणार आहे.    लॉकडाऊनच्या वेळी कारागृहात कमीत कमी अधिकारी असतील याची काळजी तुरूंग अधीक्षक यांनी घ्यावी. तसेच या काळात कारागृहाचे सर्व दरवाजे अधीक्षकांच्या स्वाक्षरीने बंद करण्यात येणार आहेत. याशिवाय  एका महिन्याकरिता पुरेल एवढी साधनसामग्री कारागृहात उपलब्ध आहे याची खात्री करण्यात यावी. अशा सूचना अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी (उदा. एखाद्या कैद्याला जामिनावर सोडणे,  वैद्यकीय कारण) यासाठी मुख्य प्रवेशद्वार उघडण्याची गरज भासल्यास अधीक्षकांनी संबंधित विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच कारागृह उपमहानिरीक्षक यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. या लॉकडाऊनच्या काळात  अधीक्षकांनी एका अधिकाऱ्याची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करावी. आणि त्या  समन्वय अधिकारी लोक डाऊन मध्ये कारागृहात कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या कुटुंबीयांशी संपर्कात राहावे. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.   लॉकडाऊन मध्ये कारागृहात नियुक्त नसलेले कर्मचारी यांनी स्वत:ला त्यांच्या घरी लॉकडाऊन करावे. पुढे आवश्यकतेनुसार त्यांना सूचना देऊन कामावर बोलून घेण्यात येणार आहे.      संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबियावर काही प्रसंग ओढवल्यास त्यांनी तातडीने समन्वय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. लॉकडाऊन किती काळ सुरू ठेवावे याबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल. अधीक्षकांनी स्थानिक पोलिसांना पत्र लिहून वसहतीच्या विलगीकरणासाठीआवश्यक त्या पोलीस संरक्षनाची व्यवस्था करावी. तसेच लॉकडाऊन काळात जो अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कारागृहात कार्यरत आहे त्यांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना पुन्हा ड्युटीवर हजर करण्याच्या सूचना रामानंद यांनी आपल्या आदेशातून दिल्या आहेत. 

* न्यायालयाने 7वर्षांपेक्षा कमी शिक्षा असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील विविध कारागृहातून 3 हजार 271 कैदी सोडण्यात आले आहेत.

टॅग्स :Puneपुणेyerwada jailयेरवडा जेलjailतुरुंगPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस