Corona virus: 8,998 new cases of corona in the state, 60 deaths | Corona virus: राज्यात काेराेनाचे ८ हजार ९९८ नवे रुग्ण, ६० मृत्यू

Corona virus: राज्यात काेराेनाचे ८ हजार ९९८ नवे रुग्ण, ६० मृत्यू


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गुरुवारी ८,९९८  नवीन काेराेनाबाधित रुग्णांचे निदान झाले असून, ६० मृत्यूंची नोंद झाली. बुधवारी ९ हजार ८५५ रुग्णांची नोंद, तर ४२ मृत्यू झाले हाेते. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी बाधितांचा आकडा काहीसा कमी झाला असला तरी बळींचा आकडा वाढला आहे. राज्यातील काेरोनाबाधितांची एकूण संख्या २१,८८,१८३  झाली असून, बळींचा आकडा ५२ हजार ३४० आहे. सध्या ८५,१४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती राज्याच्या  आरोग्य विभागाने दिली आहे.


nदिवसभरात ६,१३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २०,४९,४८४ बधितांनी कोरोनावर मात केली.  त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६६% एवढे झाले आहे. सध्या मृत्यूदर २.३९ टक्के आहे. 
nतपासलेल्या १,६५,९६,३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,८८,१८३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,९१,२८८ व्यक्ती होम, तर ४,१०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

दिवसभरात ७५ हजारांहून अधिक जणांचे लसीकरण
मुंबई : राज्यात गुरुवारी पार पडलेल्या लसीकरण सत्रात एकूण ७५,४५२ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ६२,२८७ जणांना पहिला, तर १३,१६५ जणांना दुसरा डाेस देण्यात आला. ७३,३५० जणांना कोविशिल्ड, तर २,१०२ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona virus: 8,998 new cases of corona in the state, 60 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.