Corona Vaccination : राज्यात शुक्रवारी ९६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 05:00 AM2021-04-11T05:00:07+5:302021-04-11T07:09:19+5:30

Corona Vaccination :राज्यात आतापर्यंत १० लाख ४२ हजार ६०८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर ५ लाख ४ हजार ३५७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

Corona Vaccination: Vaccination of more than 96 lakh beneficiaries in the state on Friday | Corona Vaccination : राज्यात शुक्रवारी ९६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण

Corona Vaccination : राज्यात शुक्रवारी ९६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण

Next

मुंबई :  राज्यात शुक्रवारी दिवसभरात २ लाख ७२ हजार ४२१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत राज्यात एकूण ९६ लाख ३९ हजार ८०६ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात आतापर्यंत १० लाख ४२ हजार ६०८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर ५ लाख ४ हजार ३५७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ९ लाख ३० हजार ५३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ३ लाख ७ हजार ५१ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असलेल्या ६७ लाख ३६ हजार ६४० लाभार्थ्यांना पहिला डोस, तर १ लाख १९ हजार ९७ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

राज्यात आतापर्यंत मुंबईत १६ लाख ६ हजार ९४४ लाभार्थ्यांना, पुण्यात १३ लाख १० हजार ५६६, ठाण्यात ७ लाख १९ हजार ३९७, नागपूरमध्ये ६ लाख ८२ हजार ११९, नाशिकमध्ये ४ लाख २८ हजार ४४८ लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. 
 आतापर्यंत २ लाख ५७ हजार ६० आरोग्य कर्मचारी, २ लाख ७६ हजार १९२ फ्रंटलाइन कर्मचारी, ४५ ते ५९ वयोगटातील ४ लाख २६ हजार ६२३ आणि ६० हून अधिक वय असलेल्या ६ लाख ५४ हजार ४०३ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.  

Web Title: Corona Vaccination: Vaccination of more than 96 lakh beneficiaries in the state on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.