Corona Vaccination: Vaccination of 1 crore 1 lakh 99 thousand 367 people in the state | Corona Vaccination : राज्यात १ कोटी १ लाख ९९ हजार ३६७ जणांचे लसीकरण

Corona Vaccination : राज्यात १ कोटी १ लाख ९९ हजार ३६७ जणांचे लसीकरण

मुंबई : राज्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरणात एक कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत १ कोटी १ लाख ९९ हजार ३६७ जणांना लस देण्यात आली आहे, तर रविवारी २ लाख २३ हजार ७५३ लाभार्थ्यांना लस दिल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
मुंबईत आतापर्यंत १६ लाख ७१ हजार ७५८, पुण्यात १४ लाख ३७ हजार २९६, ठाण्यात ७ लाख ३७ हजार १९३, नागपूरमध्ये ७ लाख ११ हजार ३७४, नाशिकमध्ये ४ लाख ५४ हजार ४८५ जणांनी लस घेतली. मुंबईत आतापर्यंत १ लाख ७९ हजार ६९२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला, तर ९१,०६६ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. 
१ लाख ७७ हजार ४६९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला, तर ८२,७६७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. याशिवाय ४५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या ११ लाख २१ हजार ५८७ लाभार्थ्यांना पहिला, तर १९ हजार १७७ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Vaccination: Vaccination of 1 crore 1 lakh 99 thousand 367 people in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.