शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

Corona Vaccination: कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर केंद्रावरच व्यक्तीचा मृत्यू; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 19:37 IST

Person Died after Corona Vaccination: ठाणे येथील मनोरमा नगर येथील रहिवासी असून भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहन चालक म्हणून काम करत होते

ठळक मुद्देमंगळवारी सकाळी ११ वाजता ते कोवीड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी शहरातील भाग्यनगर येथील कोवीड लसीकरण केंद्रात गेले होतेदुसरा डोस घेतल्यानंतर ते लसीकरण केंद्रातील प्रतीक्षा गृहात थांबले होतेसाधारण पंधरा मिनिटांनी त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडले, उपचारादरम्यान मृत्यू

नितिन पंडीत 

भिवंडी - कोरोनाचा धोका वाढू नये म्हणून देशभर नागरिकांना कोरोनापासून बचाव करणाऱ्या लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन प्रतीक्षा कक्षात थांबलेल्या इसमाला लसीकरण केंद्रातच चक्कर आल्याने त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची घटना भिवंडीतील भाग्यनगर येथील लसीकरण केंद्रात मंगळवारी घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मृत्यूचे नेमकी कारण अजूनही समजले नसल्याने आरोग्य विभागात देखील मोठी खळबळ उडाली आहे.(One person died at the vaccination center after taking the second dose of corona Vacciene at Bhiwandi) 

सुखदेव किर्दत ( वय ४५ ) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून ते ठाणे येथील मनोरमा नगर येथील रहिवासी असून भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहन चालक म्हणून काम करत होते . मंगळवारी सकाळी ११ वाजता ते कोवीड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी शहरातील भाग्यनगर येथील कोवीड लसीकरण केंद्रात गेले असता दुसरा डोस घेतल्यानंतर ते लसीकरण केंद्रातील प्रतीक्षा गृहात थांबले होते . त्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी त्यांना चक्कर आल्याने ते खाली पडले त्यांना उपचारासाठी भिवंडीतील स्व इंदिरागांधी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता येथील कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . या घटनेने आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे .

दरम्यान लस घेतल्यानंतर या इसमाचा मृत्यू नेमकी कोणत्या कारणाने झाला याबाबत शव विच्छदन अहवाल आल्या नंतर माहिती मिळेल त्यासाठी ठाणे आरोग्य विभागाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक देखील भिवंडीत दाखल झाले असून शवविच्छदन अहवालानंतरच नेमकी कारण समजेल अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ . के आर खरात यांनी दिली आहे . 

तर सुखदेव किर्दत हे सकाळी ११ वाजता लसीकरण केंद्रात आले, त्यांचा रुग्ण इतिहास व इतर वैद्यकीय बाबींची चौकशी व तपासणी केली असता सर्व व्यवस्थित होते त्यानंतरच त्यांना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला, त्यांच्या अगोदर इतर सात जणांना देखील डोस देण्यात आले ते सर्व व्यवस्थित असून ऑब्झर्वेशन कक्षात किर्दत बसले असता त्यांना चक्कर आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले अशी माहिती लसीकरण केंद्रात कर्तव्यावर असलेल्या सुगंधा कांबळे , समिधा पाईकराव , पूनम ठाकरे या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दिली आहे . 

माझे पती आज दुसरा डोस घेणार असल्याची माहिती सकाळी मला माझ्या पतीने दिली होती , नेहमीप्रमाणे आज ते कामावर देखील गेले , मात्र दुपारी मला त्यांचा अपघात झाला असल्याचा फोन आल्याने मी आयजीएम रुग्णालयात आले असता पतीच्या निधनाची बातमी समजली , या घटनेने मला धक्काच बसला असून या घटनेची सखोल चौकशी व्हावी व मला न्याय मिळावा अशी प्रतिक्रिया मयत सुखदेव किर्दत यांची पत्नी सोनाली किर्दत यांनी दिली आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस