Corona Vaccination : जून अखेरपासून राज्याला दर दिवसाला मिळणार तब्बल नऊ लाख लसींचे डोस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 07:46 IST2021-06-11T07:45:47+5:302021-06-11T07:46:08+5:30

Corona Vaccination : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याला जून महिन्यात एकूण ७० लाख, तर जुलै महिन्यात एक कोटी लसींचे डोस मिळतील.

Corona Vaccination: From the end of June, the state will get a daily dose of nine lakh vaccines | Corona Vaccination : जून अखेरपासून राज्याला दर दिवसाला मिळणार तब्बल नऊ लाख लसींचे डोस

Corona Vaccination : जून अखेरपासून राज्याला दर दिवसाला मिळणार तब्बल नऊ लाख लसींचे डोस

मुंबई : केंद्र शासनासोबत लसीच्या पुरवठ्याविषयी घेण्यात आलेल्या बैठकीत संसर्ग नियंत्रणाच्या दृष्टीने सकारात्मक बाब समोर आली आहे. त्यानुसार, जून अखेरपासून राज्याला दर दिवसाला  तब्बल नऊ लाख लसींचे डोस पुरविण्यात येतील. कोव्हॅक्सिन, कोविशिल्डचे उत्पादन वाढविले आहे. स्पुतनिक लसही वितरणासाठी उपलब्ध झाली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याला जून महिन्यात एकूण ७० लाख, तर जुलै महिन्यात एक कोटी लसींचे डोस मिळतील. लसींचा योग्य पुरवठा उपलब्ध झाल्यास दिवसाला १५ लाख जणांचे लसीकरणाचे लक्ष्य असल्याचे आराेग्य विभागाने नमूद केले. पालिकेचे अतिरिक्त आय़ुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, राज्याला उपलब्ध होणाऱ्या एकूण पुरवठ्यापैकी १० टक्के लस मुंबईला मिळतील. गेल्या महिन्यात साठा कमी मिळाला होता, त्यामुळे आता अधिक लसींचा साठा देण्याची विनंती केली आहे.
मे महिन्यात केंद्राने राज्याला ४०.६ लाख लसींचे डोस पुरविले. तर २५.१ लाख लसींचे डोस राज्याने खरेदी केले. ते १८ ते ४४ वयोगटासाठी खरेदी केले होते, परंतु नंतर ४५ हून अधिक वय असणाऱ्यांनाही यातून लस देण्यात आली. राज्यातील खासगी व्यवस्थापनांनी ३२.३८ लाख लसींचे डोस मे महिन्यात खरेदी केले आहेत.

जागतिक निविदा काढून लस घेण्याचा निर्णय रद्द
४५ हून अधिक वयाचे अतिजोखमीच्या गटातील असल्याने त्यांना पहिला डोस देण्यात येईल, त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील शासकीय-पालिका संस्थांमधील लसीकरण पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्य विभागाने सांगितले. जागतिक निविदा काढून लस घेण्याचा निर्णय तूर्त रद्द केल्याचे आरोग्य विभागाचे लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.

Web Title: Corona Vaccination: From the end of June, the state will get a daily dose of nine lakh vaccines