Corona Vaccination of 33,044 beneficiaries in a day in the state | Corona vaccine : राज्यात दिवसभरात ३३,०४४ लाभार्थ्यांना लस

Corona vaccine : राज्यात दिवसभरात ३३,०४४ लाभार्थ्यांना लस

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात मंगळवारी पार पडलेल्या ५९४ व्या लसीकरण सत्रात एकूण ३३,०४४ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी २६,५२२ जणांना पहिला तर ६,५२२ जणांना दुसरा डाेस देण्यात आला.


५,८२२ आऱोग्य कर्मचारी व ४,५८९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला तर ६,५०७ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डाेस देण्यात आला. ४५ वर्षे ते ६० वर्षे या वयोगटातील सहव्याधी असलेल्या ३,८१२ लाभार्थ्यांना पहिला डाेस देण्यात आला. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वयोगटातील १२,२९९ जणांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ३१,९६४ लाभार्थ्यांना कोविशिल्ड तर १,०८० जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत १ लाख ७८ हजार ७७२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला असून आतापर्यंत एकूण १२,६६,१०८ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली.

लसीचा दुसरा डोस घेण्यात आघाडीवर असलेले जिल्हे
मुंबई - २३ हजार ८४०
ठाणे - १७ हजार ६४१
पुणे - १३ हजार ८०५

दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण
जिल्हा    ४५ ते ६०    ६० हून अधिक एकूण
मुंबई    २०६८    ५३०    २५९८
नागपूर    १७०    २०७२    २२४२
ठाणे    २४२    १८३६     २०७८
नाशिक    ११४    १०९४     १२०८

आतापर्यंत लसीकरणात आघाडीवर असलेले जिल्हे
जिल्हा    लाभार्थी
मुंबई    २ लाख २५ हजार २१५
पुणे    १ लाख २६ हजार ६६३
ठाणे    १ लाख १३ हजार ३४६
जिल्हा    लाभार्थी
नागपूर    ६० हजार ९०२
नाशिक    ५७ हजार ३४३

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Vaccination of 33,044 beneficiaries in a day in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.