शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

‘आरोग्य’च्या संकेतस्थळाला ‘कोरोना’च्या माहितीची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 7:43 PM

राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर मात्र अद्ययावत माहितीचा ठणठणाट

ठळक मुद्देअद्ययावत माहिती नाही : राज्य शासनाचे दुर्लक्षरुग्णाची तपासणी, विलगीकरण, रुग्णालयात भरती व घरी सोडण्याबाबतच्या सूचना

राजानंद मोरे - 

पुणे : नागरिकांना सहजपणे माहिती मिळावी, या उद्देशाने शासनाची सर्व संकेतस्थळे अद्ययावत असणे अपेक्षित आहे. मात्र, महाराष्ट्रासह जगभरात ‘कोरोना’ या साथीच्या आजाराचा विळखा पडलेला असताना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर मात्र अद्ययावत माहितीचा ठणठणाट आहे. इंग्रजीतून मार्गदर्शक सूचना वगळता संकेतस्थळावर टोल फ्री क्रमांकही देण्यात आलेला नाही. त्यातुलनेत केरळ राज्याचा आरोग्य विभाग अद्ययावत असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणूने थैमान घातलेले असल्याने जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ‘कोरोना’विषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध माध्यमांतून उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य विभागाची संकेतस्थळे, टिष्ट्वटर, फेसबुक, माहिती पुस्तिका, पोस्टर याद्वारे माहिती प्रसारित केली जात आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे संकेतस्थळावरही कोरोनाविषयी सर्व प्रकारची माहिती देण्यात आली आहे.

राज्यातील नियंत्रण कक्ष, दैनंदिन माहिती, प्रवासी व नागरिकांसाठीच्या सूचना आदी माहिती देण्यात आलेली आहे. देशात केरळ राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर सतर्क झालेल्या केरळ राज्य शासनानेही आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरकोरोनाविषयी माहिती दिली आहे. केरळनंतर सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक ११ रुग्ण (शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत) आहेत. पण शासनाच्या संकेतस्थळावर मात्र माहितीचा ठणठणाट दिसून येत आहे.केरळ आरोग्य विभागाचे संकेतस्थळ उघडल्यानंतर लगेच २४ तास उपलब्ध असलेले राज्य कोरोना कॉल सेंटरचे सहा क्रमांक दिसतात. त्याखाली रुग्णाची तपासणी, विलगीकरण, रुग्णालयात भरती व घरी सोडण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा व राज्य नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक व राज्यातील दररोजची कोरोनाच्या रुग्णांचे आकडेही दिले जात आहेत. आरोग्य मंत्र्यांच्या कोरोनाविषयीच्या व्हिडीओसह अधिकारी व डॉक्टरांचे मार्गदर्शन करणारे व्हिडीओही आहेत. ही सर्व माहिती इंग्रजी व मल्याळम या भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र आरोग्य विभागाचे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आलेले नाही. संकेतस्थळावर केवळ ‘कोरोना आजाराच्या मार्गदर्शक सूचना’ देण्यात आल्या आहेत. पण या सूचनाही राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (एनसीडीसी) तयार केलेल्या असून त्या इंग्रजीमध्ये आहेत. याव्यतिरिक्त संकेतस्थळावर कोरोनाविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, स्वाइन फ्लू या आजाराचा साधा उल्लेखही संकेतस्थळावर करण्यात आलेला नाही. देशात स्वाइन फ्लूचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. 000

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकारHealthआरोग्य