शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अर्थचक्र कोलमडले; बळीराजाने मात्र तारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 06:30 IST

राज्याचे आर्थिक चित्र; तूट ८ टक्क्यांची; उद्योग क्षेत्रही डबघाईला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अर्थचक्राला बसलेली खीळ व औद्योगिक उत्पादन कमी झाल्यामुळे चालू आर्थिक वर्षात (२०२०-२१)  राज्याच्या आर्थिक विकासात आठ टक्क्यांनी घट झाल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी कृषी हे एकमेव क्षेत्र असे आहे की ज्यात ११.७ टक्के वाढ अपेक्षित आहे. कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला बळीराजाने तारल्याचे चित्रही यानिमित्ताने समोर आले आहे. 

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शुक्रवारी आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार उद्योग व सेवा क्षेत्रात अनुक्रमे ११.३ टक्के व ९ टक्के घट दिसत आहे. कृषी क्षेत्राने मात्र कोरोनाच्या लाटेतही केवळ तगच धरला नाही, तर भरारीदेखील घेतली असे आशादायक चित्र दिसते. कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांतही वाढ झाली आहे. कोरोनाने सगळे जग थांबलेले असताना शेतकरी शेतात राबला आणि त्याने राज्याचा गाडा चालू ठेवला. पशुसंवर्धन, वने व लाकूड तोडणी, मत्स्यव्यवसाय व मत्स्यशेती या क्षेत्रात अनुक्रमे ४.४ टक्के, ५.७ टक्के आणि २.६ टक्के वाढ झाली आहे. सेवा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या व्यापार, दुरुस्ती, हॉटेल्स, उपाहारगृहे आणि वाहतूक या क्षेत्रात ९ टक्के घट झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

कृषी उत्पादनात वाढगतवर्षीच्या तुलनेत तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, कापूस व उसाच्या उत्पादनात अनुक्रमे ६० टक्के, १४ टक्के, २८ टक्के, ३३ टक्के आणि ४० टक्के वाढ आहे. 

महसुलात घटराज्याची २०२०-२१ मध्ये अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमा ३,४७,४५७ कोटी तर २०१९-२०च्या सुधारित अंदाजानुसार ३,०९,८८१ कोटी रु. आहे. अर्थसंकल्पीय अंदाज २०२०-२१ नुसार कर महसूल आणि करेतर महसूल (केंद्रीय अनुदानासह) अनुक्रमे २,७३,१८१ कोटी व ७४,२७६ कोटी रु. आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत प्रत्यक्ष महसुली जमा १,७६,४५० कोटी म्हणजे अंदाजाच्या ५० टक्केच आहे. महसुलाबाबत महाराष्ट्र माघारला आहे.

उत्पन्न १ लाख ५७ हजार कोटींनी घटणारविविध करांद्वारे राज्य शासनाला मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली. राज्य उत्पन्नात १ लाख ५६ हजार ९२५ कोटींची घट अपेक्षित असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. २०१९-२० मध्ये राज्याचे स्थूल उत्पन्न २८१८५५५ कोटी रु. इतके होते. यंदा ते २६६१६२९ कोटीपर्यंतच मजल मारू शकणार आहे. 

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच नंबर वनथेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात नंबर वनच असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. एकूण गुंतवणुकीपैकी २७ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात आली.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEconomyअर्थव्यवस्थाFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र