स्वयंपाकाच्या गॅसचा ठणठणाट, महामुंबईतील अनेक भागांत काळ्या बाजारात व्यावसायिक सिलिंडरची पाच हजारांत विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 06:24 IST2026-03-12T06:24:12+5:302026-03-12T06:24:28+5:30

ग्राहकांना घाेर; दोन-तीन दिवसांची प्रतीक्षा 

Cooking gas shortage: Commercial cylinders sold for Rs 5,000 in black market in many parts of Mumbai | स्वयंपाकाच्या गॅसचा ठणठणाट, महामुंबईतील अनेक भागांत काळ्या बाजारात व्यावसायिक सिलिंडरची पाच हजारांत विक्री

स्वयंपाकाच्या गॅसचा ठणठणाट, महामुंबईतील अनेक भागांत काळ्या बाजारात व्यावसायिक सिलिंडरची पाच हजारांत विक्री

मुंबई, ठाणे : पश्चिम आशियातील युद्धाचा मोठा परिणाम महामुंबईतील स्वयंपाकाच्या गॅस वितरणावर झाला आहे. ठाण्यात व्यावसायिक गॅस सिलिंडर काळ्या बाजारात तब्बल ४ ते ५ हजारावर पोहचला आहे. नवी मुंबईतील ग्राहकांना सिलिंडरसाठी दोन ते तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. मुंबई, रायगड, पालघरमध्येही या टंचाईचे चटके तीव्र आहेत. 
 
मुंबईतल्या घराघरात स्वयंपाकाच्या गॅसची चर्चा जोर धरू लागली आहे. कारण गॅस बुकिंग घेणाऱ्या कंपन्यांनी दिलेला नंबर बंद असल्याने गॅस कसा आणि कुठून बुक करायचा, असा प्रश्न तमाम गृहिणी वर्गाला पडला आहे. दरम्यान, संबंधित नंबरहून गॅस बुक होत नसल्याने इतर ॲपचा पर्यायदेखील पुढे असला तरी नोंदणीकृत नंबरहून गॅस बुक केल्यानंतर निश्चित दिवसांचा कालावधी दाखविल्या जात असल्याने गृहिणींसमोरचे टेन्शन वाढतच आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काही जण काळा बाजार करत असल्याचा आरोप ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी केला.  सुमारे १,८०० रुपयांचे सिलिंडर ४ ते ५ हजार रुपयांना विकले जात असल्याचे ठाणे हॉटेल असोसिएशनने सांगितले. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून काळ्या बाजारावर नियंत्रण आणावे, अशी मागणी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. 

खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांनाही फटका

ठाणे : ठाण्यातील काळ्या बाजारात गॅस विक्री करणाऱ्या गोडाउन आणि फिलिंग सेंटरवर छापे टाकावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा काही दिवसांत अनेक हॉटेल बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली. 
ठाणे शहरात सुमारे १२०० हॉटेल कार्यरत असून, लहान-मोठ्या खाद्य व्यावसायिकांची संख्या पाच हजारांपेक्षा जास्त आहे. गॅस टंचाई वाढल्यास वडापावसारख्या छोट्या खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे, असेही संघटनेने सांगितले.

नवी मुंबई, पनवेलमधील ग्राहकांची चिंता वाढली

नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल शहरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

अनेक गॅस एजन्सींमध्ये सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने ग्राहकांना दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात ३५ ते ४० एजन्सी असून, त्या सुमारे ६.५ ते ७ लाख ग्राहकांना एलपीजी गॅस पुरवठा करतात. परंतु, टंचाईमुळे हे सर्व ग्राहक गॅसवर आले आहेत.

शहरातील अनेक गॅस वितरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. काही ठिकाणी वितरण उशिरा होत असल्याने नागरिकांना वारंवार एजन्सीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. टंचाईचा सर्वाधिक फटका हॉटेल, उपाहारगृह व्यवसायाला बसू लागला आहे.

नवी मुंबई, पनवेलमधील ग्राहकांची चिंता वाढली

नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल शहरात एलपीजी गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक गॅस एजन्सींमध्ये सिलिंडरचा पुरवठा कमी झाल्याने ग्राहकांना दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात ३५ ते ४० एजन्सी असून, त्या सुमारे ६.५ ते ७ लाख ग्राहकांना एलपीजी गॅस पुरवठा करतात. परंतु, टंचाईमुळे हे सर्व ग्राहक गॅसवर आले आहेत.

शहरातील अनेक गॅस वितरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. काही ठिकाणी वितरण उशिरा होत असल्याने नागरिकांना वारंवार एजन्सीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. टंचाईचा सर्वाधिक फटका हॉटेल, उपाहारगृह व्यवसायाला बसू लागला आहे.

बुकिंगसाठी ग्राहकांच्या दुकानांसमोर रांगा 

अलिबाग :  रायगड जिल्ह्यात गॅस सिलिंडर बुकिंगसाठी ग्राहकांच्या दुकानांसमोर रोज रांगा लागलेल्या दिसत आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणेही बंद झाल्याने जिल्ह्यात हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. गॅस सिलिंडर तुटवड्यामुळे पर्यटनावरही परिणाम दिसू लागला आहे.

हॉटेल व्यवसायात दररोज चार ते पाच गॅस सिलिंडर लागतात. सध्या एक दिवस पुरेल एवढा साठा आहे. त्यामुळे ज्या पदार्थाला जास्त गॅस लागतो ते पदार्थ बंद केले आहेत. कमी वेळ लागतो असे पदार्थ शिजवले जात आहेत.
प्रकाश पाटील, हॉटेल व्यावसायिक

Web Title : मुंबई में गैस सिलेंडर की किल्लत: काला बाजारी जोरों पर, कीमतें आसमान छू रही हैं

Web Summary : पश्चिम एशिया में तनाव के कारण मुंबई में खाना पकाने की गैस का संकट गहरा गया है। काला बाजारी में व्यावसायिक सिलेंडर ₹5,000 में बिक रहे हैं। घरों और व्यवसायों को किल्लत, लंबे इंतजार और बढ़ती लागत से जूझना पड़ रहा है, जिससे होटल और खाद्य विक्रेता प्रभावित हैं।

Web Title : Gas Cylinder Shortage Grips Mumbai: Black Market Thrives, Prices Soar

Web Summary : Mumbai faces a cooking gas crisis due to West Asia tensions. Commercial cylinders sell for ₹5,000 in the black market. Homes and businesses struggle with shortages, long waits, and rising costs, impacting hotels and food vendors.