शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पवार, सावंत आणि रिक्षावाला! ती आमची भाषा...; नव्या वादानं उद्धव ठाकरेंची अडचण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 15:32 IST

एकनाथ शिंदे प्रभावीपणे सरकार चालवतायेत. मीदेखील गिरणी कामगाराचा मुलगा आहे असं भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुंबई - महाविकास आघाडी सरकार बनवताना काँग्रेस-राष्ट्रवादीत दिग्गज नेते आहेत. ते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची गळ घातली गेली असं विधान ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अरविंद सावंत यांनी सांगितलेला रिक्षावाला हा शब्द शरद पवारांचा नाही असं स्पष्टीकरण NCP नेते अजित पवार यांनी दिले मात्र आता या विधानावरून भाजपाने समाचार घेतला आहे. 

भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, हे विधान फार गंभीर असून श्रमशक्तीचा अपमान आहे. रिक्षा चालवणारा सरकार चालवू शकत नाही का? एकनाथ शिंदे प्रभावीपणे सरकार चालवतायेत. मीदेखील गिरणी कामगाराचा मुलगा आहे. एखाद्या सामान्य घरातील माणसं राज्य चालवतायेत हे त्यांना सहन होत नाही असं म्हणत पाटलांनी खासदार अरविंद सावंत आणि शरद पवारांना टोला लगावला आहे. 

अजित पवारांनी मांडली भूमिकाखासदार अरविंद सावंत यांनी जे विधान केले. शरद पवारांच्या नावाचा उल्लेख करून रिक्षावाला या शब्दाचा वापर केला. शरद पवारांनी नेहमी ५५-६० वर्षात राजकीय जीवनात काम करताना प्रत्येकाचा आदर केला आहे. कष्टकरी घराण्यातून शरद पवार पुढे आले आहेत. त्यामुळे असा शब्द त्यांच्याकडून कधी वापरला नाही असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं. 

ती आमची भाषा रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं विधान खासदार अरविंद सावंत यांनी केल्यानंतर त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. या शब्दावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता पाहून अरविंद सावंतांनी यावर सारवासारव केली. अरविंद सावंत म्हणाले की, महाविकास आघाडीची स्थापना होताना ही वस्तूस्थिती होती. मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली. मला एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचंय आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु रिक्षावाला हा शब्द मी वापरला. हा शब्द शरद पवारांनी वापरला नव्हता. शरद पवार असे शब्द वापरत नाहीत ही शिवसैनिकांची भाषा आहे असा खुलासा खासदार अरविंद सावंत यांनी केला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेArvind Sawantअरविंद सावंतBJPभाजपाSharad Pawarशरद पवार