शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 08:40 IST

महाराष्ट्रात प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी ६९ हवामापन केंद्रे आहेत. त्यांपैकी ३२ केंद्रे महामुंबईत आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली आहे.

डॉ. अविनाश ढाकणेसदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

महाराष्ट्रात प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी ६९ हवामापन केंद्रे आहेत. त्यांपैकी ३२ केंद्रे महामुंबईत आहेत. मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली आहे. समितीच्या  बैठकांमध्ये प्रदूषण कसे होते? का होते? त्यावर उपाय काय? याची चर्चा होते, प्रश्नांची उत्तरे शोधली जातात. सूचनाही केल्या जातात. त्यांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रदूषण रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी महामुंबईमधील इतर प्राधिकरणांच्या मदतीने सुवर्णमध्य साधला जात असल्याचा विश्वास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

प्रदूषणकारी घटक कोणते आहेत?उत्तर : मुंबईत पीएम १०चे प्रमाण कमी आहे. दोन ते तीन वर्षांचा विचार करता २०२४ हे वर्ष २०२३  च्या तुलनेत चांगले होते. २०२५मध्ये जानेवारीपासून प्रदूषणाचे प्रमाण वाढले. याचे कारण प्रदूषण करणारे घटक वाढले आहेत. वाहनांची संख्या, बांधकामे वाढत आहेत. सार्वजनिक प्रकल्प सुरू आहेत. मेट्रो, पुलांची कामे सुरू आहेत. त्यातून निघणारे घटक प्रदूषण वाढवत आहेत.  

प्रदूषण कमी कसे करणार?उत्तर : मुंबई किंवा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. पीएम २.५ आणि पीएम १० चे प्रमाण जास्त आहे. धूलिकण, वाहनांचा धूर, जाळण्यात येणारा कचरा आणि अन्य घटकांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘क्लीन एअर प्रोग्राम’ तयार केला आहे. पावसाळ्याचे चार महिने प्रदूषण कमी असते. ऑक्टोबरपासून ते वाढू लागते. ऑक्टोबरमध्ये तापमानामध्ये बदल होतात. हवेची दिशा बदलली किंवा हवा स्थिर राहिली की प्रदूषणाचे प्रमाण वाढते. 

बांधकामस्थळी काय उपाययोजना केल्या आहेत?उत्तर : मुंबई पालिकेने प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण कक्ष सुरू केला आहे. बिल्डरांना बांधकामस्थळी प्रदूषण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. बांधकामस्थळी हवामापक केंद्र बसविण्याबरोबरच तेथे किती प्रदूषण होत आहे? हे दर्शविणारा बोर्ड बिल्डरांना लावण्यास सांगण्यात आले आहे. त्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काम करीत आहे. तसेच प्रदूषण पातळी मोजण्यासाठी राज्यात ५० नवी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. 

नियमउल्लंघन करणाऱ्यांवर काय कारवाई होते?उत्तर : बांधकामस्थळावरचा राडारोडा वाहून नेताना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई आणि आसपासच्या परिसरात सुमारे ५०० आरएमसी प्लांट (रेडीमिक्स काँक्रीट प्लांट) आहेत. त्यांना प्रदूषणाबाबत खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषण कमी करणे ही सरकारची किंवा एका यंत्रणेची जबाबदारी नाही, तर सर्वसामान्यांचीही जबाबदारी आहे. कारण कुणी कचरा जाळत असेल तर त्याला प्रतिबंध केला पाहिजे.  

टीकाकारांना काय उत्तर द्याल?उत्तर : टीकाकारांनी टीका केल्याशिवाय आम्हाला अडचणी समजणार नाहीत. मात्र त्यांनीही प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

- शब्दांकन : सचिन लुंगसे, उपमुख्य उपसंपादक

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाweatherहवामान अंदाजair pollutionवायू प्रदूषण