शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योगचक्र सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 12:03 IST

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतली.

मुंबई : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तरी उद्योगचक्र थांबणार नाही यादृष्टीने नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांना बुधवारी दिले. (Continue the industry cycle even in the third possible wave CM Uddhav thackeray orders the system)विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतली. मोठ्या उद्योजकांच्या बैठकी घ्या, तिसऱ्या लाटेत उद्योग थांबणार नाहीत असे बघा, कामगारांची राहण्याची व्यवस्था उद्योगाच्या आवारातच करता येईल का तेही बघा, असे मुख्यमंत्री म्हणाले. सावधगिरीची पावले म्हणून जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत, ते कागदावर राहणार नाहीत, ते काटेकोरपणे अंमलात येतील, कुठेही गर्दी होणार नाही, सभा, समारंभ होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.मुख्यमंत्र्यांनी या वेळी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जनुकीय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) करून घेण्याचे निर्देशही आरोग्य विभागाला दिले. होमगार्ड, फिरती चाचणी केंद्रे आणि इतर आरोग्य सुविधांविषयक मागणीचा ज्या जिल्ह्यांनी उल्लेख केला त्यांच्या मागणीची दखल घ्या, असे मुख्यमंत्री म्हणाले.पॉझिटिव्हिटी दर जास्त असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत केलेल्या उपाययोजनांनंतरच्या स्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यात सर्व जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी दर तुलनेने कमी होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यातील खासगी रुग्णालयांनी लसीचे डोस वाढवून मागितल्यास राज्यात लसीकरणाला आणखी वेग देता येईल, असे राजेश टोपे म्हणाले. बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे तसेच टास्क फोर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस