ग्राहकांना वीजदरवाढीचा फटका पुन्हा बसणारच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 06:57 AM2021-03-06T06:57:17+5:302021-03-06T06:57:29+5:30

वीजतज्ज्ञ : दर स्पर्धात्मक पातळीवर आणण्यासाठी गळती, वीज खरेदी खर्च कमी करणे गरजेचे

Consumers will have to bear the electricity bill hike again | ग्राहकांना वीजदरवाढीचा फटका पुन्हा बसणारच

ग्राहकांना वीजदरवाढीचा फटका पुन्हा बसणारच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एप्रिल २०२२ नंतर महावितरण  फेरआढावा याचिका दाखल करणार आहे. त्यामुळे २०२३-२४ व २०२४-२५ या २ वर्षांत राज्यातील सर्व वीज ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा फटका बसणार हे निश्चित आहे, असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी सांगितले.
घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व शेती पंप या सर्व वर्गांचे वीजदर देशात सर्वात जास्त आहेत. औद्योगिक वीजदर सभोवतालच्या सर्व राज्यांपेक्षा १० ते ४० टक्के जास्त आहेत. अशा परिस्थितीत केवळ ०.३ टक्के कपात म्हणजे काहीच नाही. वीजदर स्पर्धात्मक पातळीवर आणण्यासाठी प्रामुख्याने वीज गळती व वीज खरेदी खर्च कमी करणे आवश्यक आहे, तसेच प्रशासकीय खर्चात कपात केली पाहिजे, असेही होगाडे यांनी सांगितले. इंधन समायोजन आकार याचे अद्याप प्रमाणीकरण व निर्धारण व आकारणी झालेली नाही. ती झाल्यानंतरच कपात की वाढ हे चित्र स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

वीजदरात कपात हे अर्धसत्य!
महावितरणच्या वीज दरामध्ये १ एप्रिल २०२० पासून सरासरी 
२ % 
कपात म्हणजे अर्धसत्य आहे. 

काही वर्गवारीतील ग्राहकांच्या 
वीज 
दरामध्ये 
१ ते ४ %  
घट होईल. 

तथापि, सर्व वीज ग्राहकांचा सरासरी देयक दर 
७.२८ रुपये 
प्रति युनिट वरून 
७.२६ रुपये 
प्रति युनिट होणार आहे. 

म्हणजेच सरासरी कपात २ पैसे प्रति युनिट म्हणजे ०.३% होणार आहे.

Web Title: Consumers will have to bear the electricity bill hike again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज