शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनाही सापडेनात बांधकाम मुख्य अभियंता

By admin | Updated: August 3, 2014 00:51 IST

सार्वजनिक बांधकाम खात्यातील प्रत्येकालाच मुख्यालयी राहण्याची सक्ती केली जात असली तरी प्रत्यक्षात या खात्याचे मुख्य अभियंताच नेहमी मुख्यालयी गैरहजर राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला.

मुख्यालयी दांडी : बैठकांच्या नावाने मुंबईतच बस्तान, अमरावती विभागाची अवस्थायवतमाळ : सार्वजनिक बांधकाम खात्यातील प्रत्येकालाच मुख्यालयी राहण्याची सक्ती केली जात असली तरी प्रत्यक्षात या खात्याचे मुख्य अभियंताच नेहमी मुख्यालयी गैरहजर राहत असल्याचा प्रकार उघडकीस आला. ते मुंबईतूनच अमरावतीचा कारभार सांभाळतात. आता तर ते आमदारांनाही मिळेनासे झाले आहेत. आमदारांना त्यांच्या भेटीशिवाय परत जावे लागत आहे. विधानसभा निवडणुका आॅक्टोबरमध्ये होऊ घातल्या आहेत. १५ आॅगस्टनंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता जारी होणार आहे. त्यामुळे विकास कामे वेगाने निकाली काढण्यासाठी आमदार व राजकीय कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे. बहुतांश कामे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येत असल्याने तेथील अभियंत्यांशी आमदार व त्यांचे पीए सतत संपर्कात असतात. अनेकदा कनिष्ठ स्तरावरील अभियंत्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यास वरिष्ठांकडे तक्रार केली जाते. परंतु तक्रार नोंदविण्यासाठी मुख्य अभियंता पी. एस. मंडपे अमरावतीत उपलब्धच राहत नसल्याची राजकीय गोटातील ओरड आहे.त्यामुळे आमदारांनाही परत जावे लागते. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका आमदाराला याचा प्रत्यय आला. कंत्राटदार, अन्य लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिकांच्यासुद्धा अशाच तक्रारी आहेत. थेट बांधकाम मंत्रालयच ‘खूश’ असल्याने मंडपे आता कुणालाही जुमानत नाहीत. अन्य काही अभियंतेही आता त्यांचाच कित्ता गिरवित आहेत. ‘लोकमत’ने मंडपेंच्या कारभारावर वृत्त प्रकाशित केले होते. अमरावतीला नियुक्ती झाल्यापासून मंडपे नेमके किती दिवस हजर आहेत, याच्या तारखाच या वृत्तातून जाहीर केल्या होत्या. हे सिक्रेट मिडियाच्या हाती गेले कसे म्हणून मंडपेंनी तीन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. हे तिघे जुन्या साहेबांचे निकटवर्तीय समजून त्यांच्यावर हा सूड उगविला गेला होता. वास्तविक त्या तारखांशी या तिघांचा दुरान्वयेही संबंध नव्हता. (जिल्हा प्रतिनिधी)