'नियमबाह्य काम करणाऱ्या राज्यपालांमुळे संविधानाला धोका, राष्ट्रपतींनी चौकशी करावी', बच्चू कडूंच मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 04:12 PM2021-09-01T16:12:57+5:302021-09-01T16:37:40+5:30

Bacchu kadu slams Bhagatsingh Koshyari: राज्यपालांमुळे देशाला आणि संविधानाला धोका आहे.

'Constitution should be threatened by outgoing governors, President should inquire', says bacchu kadu | 'नियमबाह्य काम करणाऱ्या राज्यपालांमुळे संविधानाला धोका, राष्ट्रपतींनी चौकशी करावी', बच्चू कडूंच मोठं विधान

'नियमबाह्य काम करणाऱ्या राज्यपालांमुळे संविधानाला धोका, राष्ट्रपतींनी चौकशी करावी', बच्चू कडूंच मोठं विधान

Next

नवी दिल्ली: मागील काही महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये खटके उडत आहेत. आता याच मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी गंभीर विधान केलं आहे. 'नियबाह्य काम करणाऱ्या राज्यपालांमुळे देशाला आणि संविधानाला धोका आहे. राष्ट्रपतींनी याबाबत चौकशी करावी', अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे. 

बच्चू कडू आज दिल्लीत आहेत. यावेळी मीडियाशी संवाद साधताना ते म्हणाले की, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नियमबाह्य काम करतात. त्यात राष्ट्रपतींनी लक्ष घालायला हवं. राज्यपालांमुळे राष्ट्राला, संविधानाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी आता राजभवनाची चौकशी करावी, असा गंभीर आरोप कडू यांनी केला. तसेच, यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करताना मी विरोधी पक्षनेता आहे हे सांगावच लागतं, त्यामुळेच फडणवीस नेहमी बोलत असतात, असा टोला त्यांनी लगावला.
 

Web Title: 'Constitution should be threatened by outgoing governors, President should inquire', says bacchu kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.