शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

पूर्वप्राथमिक ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा; फी वाढ आणि जमा करण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 12:29 IST

शालेय शिक्षण विभागाचे शाळांना आदेश

ठळक मुद्देघरभाडे, कर्जाचे हफ्ते देखील काही महिन्यांसाठी थांबविण्याच्या सूचना लॉकडाउन कालावधी संपल्यानंतर फी जमा करण्याबाबत सूचना

- प्रशांत ननवरे - बारामती : जागतिक आरोग्य संघटनेने  कोरोना विषाणू  या आजारास जागतिक महामारी म्हणून घोषित केलेले आहे. या काळात लागु असणाºया  संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय दुकाने,उद्योग कंपन्या बंद आहेत.त्यामुळे अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे.शासनाने कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवु नये,अशा सुचना दिल्या आहेत. घरभाडे, कर्जाचे हफ्ते देखील काही महिन्यांसाठी थांबविण्याच्या सुचना दिल्या आहेत. आता शासनाने सर्वव्यवस्थापनाच्या शाळांनाविद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लॉकडाउन कालावधी संपल्यानंतर फी जमा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.वेतन न मिळणे,वेतन न कपात,उद्योग व्यवसाय बंद असल्याने सर्वजण आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत.त्यातच अवघ्या एक महिन्यांवर नविन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे.त्यामुळे थकीत हफ्ते,घरगुती खर्च,इतर देणे आदी शैक्षणिक खर्चाच्या चिंतेने पालकांना ग्रासले होते. मात्र, शुक्रवारी (दि ८)घेतलेल्या शासन निर्णयामुळे पालंकाना दिलासा मिळाला आहे. पूर्वप्राथमिकते १२ वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता सध्या तरी दुरझाली आहे.या आजाराच्या संसर्गाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी संदर्भ क्र. ५ अन्वये राज्यात साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची अमंलबजावणी राज्यात सुरु आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. अशी परिस्थिती असतांना काही संस्था/शाळा, विद्यार्थ्यांना/पालकांना फीसभरण्याची सक्ती करीत असल्याबाबत तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्यामुळेउपरोक्त क्र.६ च्या परिपत्रकान्वये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू व आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करु नये. लॉकडाउन कालावधी संपल्यानंतर फीस जमा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ मधील कलम (२१)अन्वये प्राप्त अधिकारान्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार शासनाने  निर्णय घेतला  आहे. 

पालकांच्या सोईच्या दृष्टीने शैक्षणिक वर्ष २०१९-२० व २०२०-२१ मधील देय/शिल्लक फी वार्षिक/ एकदाच घेवु नये.तर पालकांना मासिक/त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय  दयावा, शैक्षणिक वर्ष२०२०-२०२१ साठी कोणतीही फी वाढ करु नये. शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ साठी जरकाही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही ,त्याबाबतचा खर्च कमी होणार असल्यास पालाकांच्या कार्यकारी समितीमध्ये ठराव करावा,त्याप्रमाणे योग्य प्रमाणात फी कमी करावी,लॉकडाऊन कालावधीत गैरसोयी टाळण्यासाठी पालकांना आॅनलाईन फी भरण्याचा पर्याय  देण्याची सुचनादेण्यात आली आहे. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीEducationशिक्षणSchoolशाळाState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या